पान:प्रमाणशास्त्र.pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आगंतुक पुरावा.

५१

प्रकारचा तो जिन्नस होता, याविषयी आपण विचार केला पाहिजे. पहिल्या जातीचा जिनसा जाचा कबजांत आढळतात त्याचा कबजांत येण्यापूर्वी त्या पुष्कळांचा हातून गेल्या असतील, त्या निष्कपटपणाने खरीद केलेल्या असतील, किंवा रस्त्यावर सहज चालता चालतां सांपडल्या असतील; परंतु दुसऱ्या जातीचा जिनसा थोड्या अवकाशांत एकाचा हातून दुसऱ्याचा हाती तशा जाण्या सारख्या नाहीत, हे लक्षांत ठेविले पाहिजे.

 १११.अशा स्थितीचा मनुष्याचा कबजांत प्रामाणिकपणाने येण्यासारखी ती जिन्नस आहे किंवा कसे,असाही विचार आपणास केला पाहिजे.जर एकाद्या गरीब मनुष्याचा कबजांत किंवा एकाद्या भटकणान्या व गैरअब्रूचा मनुष्याचा कबजांत एकादें मोठ्या किमतीचे घड्याळ आढळलें,तर ते,चोरीस

गेल्यानंतर पुष्कळ महिन्यांनीही,त्याजवर चोरीचा आरोप ठेवण्यास पुरते कारण होईल;परंतु एकाद्या अर्थवान मनुष्याचा कबजांत किंवा एकाद्या अब्रूदार घरोपियनाचा कबजांत ते घड्याळ सांपडल्यास,तें नतन चोरीस गेले असल्यास मात्र त्याचा जाब मागण्यांत येईल.

 ११२.जबरीची चोरी झाल्यानंतर चार वर्षानी,चोरीस गेलेला माल कैदीचा कबजांत होता,ही गोष्ट, त्याणे ती जबरीची चोरी केली याविषयी आनुमानिक पुरावा नाही,असे ठरविले गेले आहे.

 ११३. कैदीने खुलासा करून देण्याकरिता