पान:प्रमाणशास्त्र.pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


५०
आगंतुक पुरावा.

ध्यानांत ठेविले पाहिजे की,(१),चोरी नूतन असली पाहिजे; आणि (२),कबजा अनन्यग्राह्य असला पाहिजे.

 १०९. (१), कबजासहित आरोपित मनुष्य आढळण्यापूर्वी थोडक्याच अवकाशांत चोरी झालेली असली पाहिजे.चोरीचा तारखेनंतर फार अवकाशाने कबजा असल्याने कबजेवाल्यावर चोरीचा आरोप ठेविण्यास सबब होणार नाही; परंतु, चोरीचा आणि कबजाचा दरम्यान किती वेळ लोटल्याने कबजेवाला गुन्ह्याचा आरोपांतून मुक्त होईल, असे जर कोणी पुसेल, तर या प्रश्नाचे सरळ उत्तर देतां येत नाही. प्रत्यक क.जांतील सर्व हकीकतींचा विचार करून त्याचा निर्णय केला पाहिजे; परंतु जर पुष्कळ जिनसा चोरल्या असून त्या सर्व एका मनुष्याचा कबजांत आढळतील, तर तो कबजा विशेष अंदेशाचे कारण आहे,

म्हणून फार वेळानंतर ही त्या मनुष्यावर चोरीचा आरोप ठेवितां येईल. आतां उलट पाहतां, त्याचा कचजांत पुष्कळ जिनसांपैकी एकच सांपडल्यास ती चोरी अति नूतन असल्यावांचून त्याचा जाब मागू नये.

 ११०.अशा प्रभाविषयी विचार करताना,ता जिन्नस, एका कापड किंवा कुन्हाड किंवा बकरें किंवा चाकू यां सारिखा, सहज रीतीने कबजा बदल करण्याजोगा होता, किंवा, एकादें मेज किंवा मोठ आरसा ही जशी नेण्यास अवघड असतात तशा