पान:प्रमाणशास्त्र.pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आगंतुक पुरावा.

४९

 १०६. एका मनुष्याने काही फळे चोरिली होती,आणि त्याणे एक फळ टाकिलें होते,त्यावर,जा मनुष्याचे पुढील दोन दांत पडलेले आहेत अशा मनुष्याने ते चावले असल्याची निशाणी होती, तिजवरून तोच तो असा ओळखला गेला;असा कज्जा बेस्ट याणे लिहिलेला आहे, परंतु असा पुरावा निश्यायक मानूं नये,अशी त्याची सूचना आहे.

 १०७. कागदांतील पाण्याची निशाणी,ही खोटा कागद बनावण्याचा गुन्हा उमगण्यास साधन होईल; परंतु ती खुणा अनिश्यायक पुरावा आहे; कारण, कागद करणारे कारागीर केव्हां केव्हां आपल्या कागदांवर आगाऊ तारीख घालतात.कागदाचा आणि त्यावरील शाईचा स्वरूपावरून एकाद्या

दस्तऐवजाचा जुनेपणाविषयी संशय घेण्यास बहुधा पुष्कळ जागा असत्ये.परंतु रुक्ष हवेचा देशांतया देशांतील साधारण शाई उघड वान्यांत नमून एकाद्या दफ्तरखान्यांत ठेविलेली असल्यास तिचा काळेपणा पन्नास वर्षेपर्यंत टिकतो असे आढळून मला आश्चर्य झाले आहे. इंग्रेजी शाईचा रंग थोडक्याच वर्षांत उडून जातो.

 १०८.चोरीनंतर लवकरच चोरीचा मालाचा अनन्यग्रास कबजा असणे, हे, कबजेवाल्यावर चोरीचा आरोप ठेविण्यास आणि त्याणे त्या गोष्टीचे सुयुक्त कारण न दाखविले तर त्यावर तो अपराध स्थापित करण्यास एकटें बस आहे; परंतु असें