पान:प्रमाणशास्त्र.pdf/५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


४८
आगंतुक पुरावा.

 १०४. मूर्तिमंत पुरावा.- रेम्' या लाटिन शब्दाचा अर्थ मूर्ति, म्हणजे वस्तु असा होतो, म्हणून वस्तूपासून मिळालेल्या पुराव्यास 'मूर्तिमंत पुरावा'असें म्हणतात, आणि असा मूर्तिमंत पुरावा बनवलेला असल्यास तो अकल्पित फरकामुळे उघडकीस येण्यास विशेष पात्र असतो. मुर्याचा डाव्या हातावर रक्ताने भरलेल्या डाव्या पंजाचा खुणेवरून, आत्महत्येविषयींचे अनुमान उत्पन्न व्हावे, म्हणून खोटा प्रकार बनाविला आहे अशी उघडीक झाली. त्याचप्रमाणे गोळी लागून मेलेल्या मनुष्याजवळ ल्याचे पिस्तूल पडलेलें सांपडले, तेव्हां, त्याणे आपल्या स्वतांचामाण घेतला, अशी प्रथम कल्पना निघाली; परंतु पुढे मुर्यातून गोळी काढून पाहतां ती त्या पिस्तुलाचा तोंडापेक्षा मोठी असे आढळले, आणि येणेकरून खून करणाराचा वहीम आला.

 १०५. जबरीचे गुन्हे घडले असता त्यांपासून मूर्तिमंत पुराव्याचा स्वरूपाचे माग साधारणतः राहतात व ते केव्हांकेव्हां अतिशय उपयोगी पडतात. उदाहरण,एक चोर खिडकी फोडीत असतां त्याचा चाक मोडून त्याचे टोक त्या लाकडाचा चौकटीत रुतून राहिले.पुढे तपासा अंती आरोपित मनुष्याचा मोडका चाकू त्या मोडलेल्या टोकाशी जुळता आढळला. त्याच प्रमाणे गोळी घालून खून केल्याचा कज्जांत खून करणाराचा अंगावर एक पत्र सांपडले, त्याचा काही भागाचा चोंदा त्याणे ते पिस्तूल भरण्यांत घातला होता तेणेकरुन तोच खून करणारा असा ओळखला गेला.