पान:प्रमाणशास्त्र.pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आगंतुक पुराधा.

४७

मनुष्याची आहेत, असे स्पष्टपणे ओळखतां आलें नाही,म्हणून मद्रास फौजदारी अदालतीने त्या कैदीवर अपराधस्थापन करण्याचे फार योग्य रीतीने नाकबूल केलें.

 १०२. जी घडलेली गोष्ट अपराधमूर्तीची पाया.भूत असेल, (उदाहरण, खुनाचा खटल्यांत मरणाविषयींची गोष्ट,) तिची एक वेळ शाबिती झाल्यावर, वीज,किंवा थंडी,किंवा अकारणत्व,किंवा रोग किंवा आत्महत्या,अशा नैसर्गिक कारणांनी ते मूळ किंवा ती पायाभूत गोष्ट उत्पन्न झालेली नसून,अपराधकर्तृत्वाने उत्पन्न झालेली आहे, असे दाखविण्याकरितां आगंतुक पुरावा अवश्य ग्राह्य आहे. त्याचप्रमाणे, एकाद्या मुर्याचे व त्याचा वस्त्रांचे स्वरूप,आणि त्यावरचा जखमांचे वळण व स्वरूप, आणि त्याचा तोंडवळ्याची ठेव, आणि रक्त किंवा घातक हत्यार किंवा झोंबाझोंबी झाल्याचे जमिनीवरील माग, यांचा विद्यमानतेचा पुराव्यास आगंतुक पुरावा साधारणतः घेतला जातो.

 १०३. राजद्रोह आणि संगनमत आणि निरनिराळ्या महत्त्वाची सदोष बोलाचाली,असे कितीएक अपराध आहेत त्यांत हेतु हा मुख्य भाग असतो; आणि अपराधी गोष्टीचा कर्ता दर्शित केल्यावांचूनल्या सापराध गोष्टीची शाबिती होत नाही,अशा स्वरूपाचे ते असतात; आणि असे अपराध मुळीच आगं. तुक पुराव्याने अवश्य शानीत करता येतील,आणि त्याचममाणे व्यभिचाराचा गुन्हाही शाबीत करता येईल,