पान:प्रमाणशास्त्र.pdf/५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४६

                   आगंतुक पुरावा.
 १००. आगंतुक पुरावा घेण्यापूर्वी जा सदोष गोष्टीची प्रथमतः शाबिती करणे 
अवश्य आहे, तीस (इंग्रेजीत कार्पडिलिक्याय म्हणजे )अपराधमूर्ति,असे 
म्हणतात. आणि त्या गोष्टीचे बहुधा दोन भाग असतात, असे साधारणतः 
आढळते.पहिला भाग,म्हणजे तिचे मूळ किंवा पाया.जसे, खुनाचा कजांत 
मुद्याचा शोध लागणे, किंवा आग लाविल्याबदलचा कज्जांत कांहीं वस्तु 
जळाली आहे,ही गोष्ट,हा पहिला भाग; आणि पूर्वोक्त गोष्टीची कारणीभूत 
अशा कर्तृत्वशक्तीचे अस्तित्व, हा दुसरा भाग. प्रत्यक्ष पुराव्याशिवाय दुसऱ्या 
रीतीनें पूर्वोक्त अपराधमूर्तीचा पायाची शाबिती कायद्याप्रमाणे होईल किंवा 
कसे,याविषयी संशय आहे; परंतु जेव्हां प्रत्यक्ष पुरावा देतां येत नाही तेव्हां 
आगंतुक पुरावा स्पष्ट निश्वयात्मक असल्यास कज्जाचा प्रत्येक इतर भागाप्रमाणे 
या भागाविषयीही तशा आगंतुक पुराव्याने शाबिती करतां येईल, हे मत ग्राह्य 
दिसते. त्या अपराधमूर्तीची गैरशाबिती करण्यास्तव आगंतुक पुरावा ग्राह्य आहे 
    १०१. कितीएक पुरातन कज्जांत अपराधमूतीविषयींची चांगली शाबिती 
झाली नसून आरोपित मनुष्यावर अपराधस्थापन करून त्याजला फाशी 
दिल्यानंतर, जा मनुष्याचा खून केला म्हणून कल्पना केली होती, तो मनुष्य 
यामान्तराहून परत आलेला आहे, अशी उदाहरणे आहेत; म्हणून एका खुनाचा 
चौकशीत, एका विहिरीत मनुष्याची काही हाडे व केश ही सांपडली असून, 
ती नाहीशा झालेल्या