पान:प्रमाणशास्त्र.pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


४५

आगंतुक पुरावा.

याचा कज्जांत लार्ड चीफ ब्यारन् पालक याणे पंचांस समजूत देतांना असे सांगितले की,जितक्या अशी खचीतपणा असल्याने तुम्ही आपली भारी महत्त्वाची कामें कराल,तिनका खचीतपणा त्या कजांत आहे,असा सिद्धान्त तुमचा मनाने केला तर त्यास कायद्याप्रमाणे जितका खचीतपणाचा अंश असावा तितका आहे,असे समजून त्यावरून अपराधाचा "ठराव करणें हें तुम्हांस न्याय्य आहे.

 ९८फौजदारी कज्जांत'उतावळेपणाने निवाडे देण्यांत येऊ नयेत, यास्तव वहिवाटीचा असा साधारण नियम आहे की, अपराध घडला आहे, असे स्पष्ट पराव्याने दाखविल्यावांचून कैदीचा अंगी अपराध लावण्याकरितां आगंतुक पुरावा मान्य केला जाणार नाहीं.

 ९९. त्याच प्रमाणे मुर्दा सांपडल्यावांचून किंवा त्या कजांतील हकीकतींवरून मरण्याचा गोष्टींचें स्पष्टपणीं अनुमान होण्याजोगे असल्यावांचून, जसे जीव घेणारा घाय मारल्यानंतर शरीर समुद्रांत नाहींसें झाले असा पुरावा असल्यावांचून,आरोपित मनुष्य अपराधी आहे, असे दाखविण्यास्तव आनुमानिक किंवा आगंतुक पुरावा घेतला जाणार नाही.आणि त्याच प्रमाणे चोरी झाली होती,अशी शाबिती झाल्यावांचून चोरी केल्याविषयीं अगर चोरीचा माल घेतल्याविषयी एकाद्या मनुष्यावर आगंतुक पुराव्यावरून अपराधस्थापन करणे हे अयोग्य होईल.