पान:प्रमाणशास्त्र.pdf/५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


४४

आगंतुक पुरावा.

सांगितले आहे की,अशा ठिकाणी"जो पुरावा हजर “केला असेल त्यासारखे पुरावे पाहिजेत तितके कल्पून त्यांचा आधार धरून निवाडा देतां येईल किंवा

"नाही,याविषयी विचार केला पाहिजे.”याविषयी जे त्याणे लिहिले आहे ते विचारार्ह आहे.जा मुद्याची शाबिती करावयाची असत्ये त्याशी योग्य रीतीने संबद्ध अशी जर कांहीं आगंतुक पुराव्याचा गोष्ट असेल,तर,तेवढ्याच गोष्टीवरून निश्यायक अनुमान स्थापित करता येत नाही,इतक्याच सबबेने ती नाकबूल करूनये;हा साधारण नियम आहे असे समजले पाहिजे.कारण, एकादी गोष्ट एकटीच असल्याने जी हलक्या वजनाची असल्ये,ती दुसऱ्या गोष्टींशी मिळून ध्यानात घेतली असतां मोठ्या महत्त्वाची होईल.

 ९६. शाबीत झालेल्या हकीकतींवरून एकादें अनुमान स्थापित करण्यास्तव न्या हकीकतींचा मुख्य गोष्टींशी संबंध निकट व अवश्य असावा; म्हणजे प्रत्यक्ष शाबीत असतां तो पुरावा जसा संशयनिवर्तक असतो असा तो असावा. कजांतील हकीकतीवरून कितीही अंदेशा येऊ, तथापि केवळ अटकळीवरून कोणतेही अनुमान निर्भयाने स्थापित करता येत नाही. विलिस्याणे कितीएक पराकाष्ठेचा बोधक कजांनीया नियमाचे स्पष्टीकरण केले आहे.

 ९७. किती आगंतुक पुरावा असला असतां अपराधाचें अनुमान करता येईल, याविषयी निश्चय करणे हे केव्हां केव्हां कठीण असते; परंतु म्यानिस