पान:प्रमाणशास्त्र.pdf/५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


४२
आगंतुक पुरावा.

अपराधाविषयींचा कल्पनेशिवाय दुसऱ्या एकाद्या कल्पनेशी पूर्वापराविरुद्ध असणान्या अशा अमुक पुराव्यावरून अपराधस्थापन करण्यांत किती जोखम आहे,हे दाखविण्याकरितां हे कज्जे बहुधा पुरतील.

 ९३. बेस्ट याणे असे म्हटले आहे की, “जा गुन्ह्यांचा हकीकती विशेषेकरून फार अघोर किंवा"विलक्षण असतात ते गुन्हे शोधून काढण्याविषयी "जी उत्कंठा उत्पन्न झालेली असत्ये, ती उत्कंठा,साक्षीदारास घडलेल्या गोष्टी विपरीत समजण्यास"किंवा फुगवून सांगण्यास, आणि न्यायाधीशांस, उतावळी अनमाने काढण्यास पुष्कळ वेळी उद्युक्त करत्ये; आणि जगांतील गोष्टींमध्ये जो क्रम व जो"मिलाफ खरोखर असतो, त्यापेक्षां ही तो विशेष असतो, असे अनुमान करण्याकडे मनुष्याचा नैसर्गिकच कल आहे; आणि त्याचप्रमाणे कित्येक “घडलेल्या तुटक गोष्टींवरून सिद्धान्त करण्याविषयी "एक मकारचा गर्व किंवा बढाई ही मनुष्यांत नैसर्गिक आहेत, ती बुद्धीस व्यामोह करण्यास समर्थ आहेत;" आणि बॉरन् आल्डर्सन् याणे एका कजांत असे म्हटल्याविषयी रिपोर्ट छापिला आहे की,कजांतील हकीकतींचें जडप बसविण्यास आणि जरूर असल्यास त्यांची थोडीशी ओढाताण करून त्यांतून एक संबद्धसाकल्याची रचना करण्याविषयी मन उत्सुक असते, आणि न्या मनुष्याची बुद्धि जशी जास्ति कल्पक असेल, त्याप्रमाणे अशा विषयाचा विचार करतानां ती आपल्या धांवे बाहेर जाऊन