पान:प्रमाणशास्त्र.pdf/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आगंतुक पुरावा.

४१

मनुष्याने करनूल येथे एका मनुष्याचा खून केल्याची चौकशी झाली, तीत असे निष्पन्न झाले की, मरणार हा आरुणोदयी आपल्या खाटेवर मरणावस्थेत पडलेला आढळला, त्याचा आंखावर एक मोठी व नूतन जखम होती, ती कुन्हाडीने केलेली असावी असे दिसलें. त्याचा पूर्व दिवशी मरणार याजवर आरोपित मनुष्याने पोलिसांत फिर्याद केली होती, या कारणावरून न्याजवर वहमा आला. जा वेळी तो माणघातक घायमारला गेला त्या वेळाचा सुमारास तो आपल्या घरी नव्हता; आणि तो परत आल्यावर तो कांही बोललाते त्या खुनासंबंधी आहे, असे नंतर समजण्यांत आलें:म्हणून शाबिती झाली; परंतु त्या बोलण्यांतील बराबर शब्दांविषयी पुरावा खातरीलायक नसून फारफेराचा होता. कैदी हा चाम्हार होता, आणि त्याचा धंद्याचा हत्यारांपैकी में एक न्याचा घरांत सांपडले, ती एक लहानशी फरशी होती, आणि मयताचा डोक्याचा पुढील भागावर जी जखम पडली होती त्या जखमेशी ती फरशी एकसारखी मिळत होती. जो अधिकारी चौकशी करण्यास बसला होता, त्याणे कैदीयाजला अपराधी ठरवून मरणाची शिक्षा देण्याविषयी शिफारस केली; परंतु, मद्रास एथील फौजदारी अदालतीस ती साक्ष अनिश्चायक वाटून त्यांणी त्यास मक्त केलें, दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणचा अधिकाऱ्याकडून कोर्टास खबर पोचली की, एका दुसऱ्या मनुष्याने तो खून केल्याविषयी कबूल केले आहे,आणि नंतर त्या मनुष्यास अपराधी ठरवून फाशी दिलें.