पान:प्रमाणशास्त्र.pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


४०
आगंतुक पुराया.

असा.- एक दासी आपल्या एकल्या धनिनीपाशी एकाच घरांत राहत असे. विणे आपल्या धनिनीचा खून केल्याचा तिजवर आरोप आला. त्या घरांत दुसऱ्या कोणाचा प्रवेश होण्याजोगा नव्हता, या अनुमानावरूनच मुख्यत्वेकरून तिजवर अपराध स्थापित करून तिजला फाशी दिले; परंतु पुढे खरोखरखून करणान्यांपैकी एकाने कबूल केले की, मी कित्येकांसुद्धा रस्त्यापलीकडचा समूरचा दुसऱ्याचा घरावरून एक फळी लावून त्या घरांत शिरलो. बेस्ट याणेही एक कज्जा सांगितला आहे, त्यांतील आरोपित मनुष्याचा कपड्यांवरील रक्ताचा डागांचे कारण सांगण्यास तो असमर्थ होता. कारण, जा एका मनुष्यास वाहती जखम असून त्याचा शेजारी आपण निजलों होतो, हे त्या आरोपित मनुष्यास माहीत नव्हते. तसेंच, आगंतुक पुराव्यावर विलिस याणे ग्रंथ केला आहे त्यांत त्याणे असे लिहिले आहे की,एका म्हाताऱ्या बायकोचा खून केल्याबदल एका चाम्हाराची चौकशी चालली असता असे दिसून आले की, त्याचा कातड्याचा मळवस्त्रावरील बाहेरचा आंगचे तुकडे कापल्याचा किती एक वायळ्या खुणा होत्या, त्या ठिकाणी, रक्ताचे डाग असल्यामुळे ते तुकडे काढून टाकिले, अशी कल्पना केली होती; परंतु कैदीने एका शेजान्याकरतां मलमपट्टयांसाठी ते कापून काढले होते, अशी खातरीलायक शाबिती झाली." 'पोतुराजु कारातिप्पडु याचा कज्जा हा आणखी एक उदाहरण आहे. या