पान:प्रमाणशास्त्र.pdf/४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आगतुक पुरावा.

३९

 ९०. फौजदारी चौकशीत जा नियमांनी बहुधा आगंतुक पुरावा मान्य केला जातो, त्याच नियमांनी दिवाणी चौकशीत तो मान्य केला जातो; परंतु प्रतिपक्षापेक्षा अधिक मजबूद पुरावा असला म्हणजे दिवाणी कजांत निवाडा देण्यास बस होतो,असे असून त्या शाबितीपेक्षा फौजदारी कज्जांत को विशेष निश्चित पुरावा मागतात. आतां या जातीचा पुरावा बहुतकरून फौजदारी कजांत विशेष साधारणतः आढळतो; कारण, गुन्हे हे बहुधा गुप्ततेने करण्यांत येतात,म्हणून ते मत्यक्ष पुराव्याने वचितच शाबीत करना येतात.

 ९१. आगंतुक पुराव्यावरून फौजदारी गुन्हा स्थापित करण्यास्तव शाबीत झालेल्या सर्व हकीकती आरोपित मनुष्याचा अपराधाशी पूर्वापराविरुद्ध असल्या पाहिजेत, इतकेच नाही तर कोणत्याही इतर अनुमानाशी असंबद्ध असल्या पाहिजेत. जर त्या हकीकती एकाद्या इतर कल्पनेशी जमत असल्या, तर अपराधाचे अनुमान निश्चायक होणार नाही, आणि न्यावरून अपराधस्थापन होणार नाही. म्हणून या बाबदीचा विचार करन्ये वेळी आरोपित मनुष्याची तकरार काळजीपूर्वक तपासून पाहिली पाहिजे. कारण,त्यावरून बहुधा कज्जाची खरी स्थितिध्यानांत येऊनी सर्व घडलेल्या गोष्टींशी जमण्याजोगी आहे, असे दिसून येईल.

 ९२. हा नियम जा कजांत अमलांत आला आहे तो कजा स्टार्कीने लिहिला आहे; तो