पान:प्रमाणशास्त्र.pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आगंतुक पुरावा.

महत्त्वाची एकटीच हकीकत जमत नसेल तिचा शाबितीविषयी असे लक्षात ठेविले पाहिजे की, जा गोष्टी साक्षीदार आपण पाहतात किंवा ऐकतात त्या गोष्टींचे बराबर अवलोकन करण्याची पुष्कळ साक्षीदारांस आदत नसत्ये, तेणेकरून ते चुकीस फार पात्र होतात;तसेंच जी गोष्ट आपण पाहिली असेल, ती, सक्त उलट सवाल झाले असतां,यथातथ्य सांगतील,असे थोडेच आहेत, आणि कितीएक असे असतात की,एकादी गोष्ट वस्तुतः खरी असतां ती अधिक खरी दिसशी करण्याकरितां किंवा आपणास मान्यता मिळण्यास्तव गोंधळांत पडून त्या हकीकतीस खोट्या गोष्टी जोडून देतात.

 ८९. तसेंच निरनिराळे साक्षीदार एकाच घडलेल्या गोष्टीविषयी मजकूर सांगत असतां त्यांत फरक सांगतात, व मजकूर गाळतात; त्यास त्याविषयी विचार करतांना इतकें लक्षात ठेविले पाहिजे की, अवलोकनाची आकलनशक्ति, स्मृति, आणि आपणास जें माहित असते ते सांगण्याची शक्ति, ही मनुष्याचा ठिकाणी इतक्या निरनिराळ्या मानाने असतात की,जर कोणत्याही तीन मनुष्यांनी एकादी गोष्ट पाहिली असेल तर त्यांचा दरम्यान मिलाफावांचन तिजविषया ते एकसारखी हकीकत वचितच सांगतील. यास्तव कज्जातील पुराव्याचा व्यापक बद्धीने साद्यंत विचार केला पाहिजे, आणि जो पुरावा इतर रीतीने वस्तुतः खरा दिसेल, त्यांत लहानसहान गोष्टींविषयी थोडे फरक असल्यामुळे उतावळीनें तो टाकून देऊ नये,