पान:प्रमाणशास्त्र.pdf/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आगंतुक पुरावा.

३७

 ८६. स्टार्कीने लिहिले आहे की, “जा सर्व घडलेल्या गोष्टी आणि हकीकती खरोखर घडल्या असतील त्या एकमेकांशी पूर्णतेने पूर्वापराविरुद्ध होन्या, हे उघड आहे; कारण त्या खरोखर तशाच घटित असतात." सत्य, हे आपल्या सर्वांशी आपल्या स्वतांशी पूर्वापराविरुद्ध असले पाहिजे; आणि यास्तव शाबीत झालेल्या हकीकतींपैकी जर एकादी हकीकत काढलेल्या सिद्धान्ताशी पूर्वापरासंबद्ध असेल, तरतो सिद्धान्त सत्य असूं शकणार नाही.

 ८७. परंतु जेव्हां एकसिद्धान्तदर्शक अशा पुष्कल गोष्टींशी न मिळणारी एकच गोष्ट आहे, असे आढळते, तेव्हां त्या न मिळणान्या गोष्टीची निःसंशयपणे शाचिती झाली की नाही याचा प्रथमतः जपून निर्णय केला पाहिजे; दुसऱ्याने, ती बुध्या फसविण्याकरितां उत्पन्न केलेली आहे की काय; आणि तिसऱ्यानें, तो विरोध खरोखर आहे, किंवा प्रथमदर्शनी मात्र दिसण्यांत येत आहे; यांविषयी निर्णय केला पाहिजे. आणि या शेवटल्या बाबतीचा विचार करत्ये वेळी जगांतील घडणाऱ्या गोष्टींचा क्रम जितका यथापद्धति आपण कल्पितों तितका खरोखर आहे किंवा कसे, वजा गोष्टीविषयी आपण विचार करीत आहों, ती ज्या गोष्टी आपणास नित्यशः आढळतात आणि जांचे कारण सांगता येत नाही, त्यांपैकी आहे किंवा कसे, याविषयी विचार करणे योग्य आहे..

 ८८. पुराव्याचा साधारण मेळाशी जी कमी