पान:प्रमाणशास्त्र.pdf/४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


३६
आगंतुक पुरावा.

साक्षीवरून त्या हकीकतींची शाबिती होत्ये, तिचे स्वरूप पाहिले तर, ती साक्षात्मंबंधाची आहे, असे म्हणणे हे विशेष रास्त आहे.

 ८३. अशा हकीकती, या साहजिक अप्रधान असून, त्यांचा झोंक मुद्याचा गोष्टींची शाबिती करण्याचा असतो, आणि त्या अप्रधान गोष्टींची शाबिती करणे ती पुराव्याचा साधारण नियमांप्रमाणे झाली पाहिजे; म्हणजे मुख्य गोष्टींची शाबिती करण्यास जो पुरावा घेतला जाणार नाही, तो पुरावा अप्रधान गोष्टींची शाबिती करण्यासही त्याचप्रमाणे साधारणतः घेतला जाणार नाही. उदाहरण, विशेष कज्जेखेरीज करून, साधारण कज्जांत एकाद्या अप्रधान गोष्टींची किंवा हकीकतीची शाबिती कर्णोपकर्णी पुराव्यावरून करता येणार नाही.

 ८४. घडलेल्या गोष्टीवरून किंवा हकीकतीवरून केलेल्या तर्कास 'अनुमान'असे म्हणतात.

 ८५. आगंतुक पुराव्यांतील सर्व शाबीत झालेल्या गोष्टी, त्या गोष्टीतून निघणान्या अनुमानाशी मात्र जुळणीचा असल्या पाहिजेत, आणि दुसऱ्या कोणत्याही अनुमानाशी जुळणीचा नसाव्या; हा गुण जसा त्या पुराव्यामध्ये असेल त्याप्रमाणे त्याची शाबीत करण्याची शक्ति असन्ये. एकाच सिद्धांताचा दर्शक, अशा शाबीत झालेल्या घडलेल्या सर्व स्वतंत्र गोष्टींचा संख्येप्रमाणे,आणि त्या घडलेल्या गोष्टींविषयी जबान्या देणान्या स्वतंत्र साक्षीदारांचाही संख्येप्रमाणे,पूर्वोक्त पुराव्याची बहुधा अधिकउणी मातबरी असत्ये.