पान:प्रमाणशास्त्र.pdf/४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अनुमाने,
३४

कायदा या अनुमानास काल्पनिक वजन देत नाही न्या पक्षी हे केवळ घडलेल्या गोष्टींचे अनुमान आहे,अशी जी धारणा स्टार्कीने केली आहे ती बरोबर आहे असे दिसते. आगंतुक पुराव्याचा सदरांत या अनुमानाचा विचार अधिक पुर्तेपणी करण्यांत येईल,( या ग्रंथाचे कलम १०८)

 ७८. कोणतेही निवार्य अनुमान प्रत्यक्ष पुराव्याने मात्र निरसित केले जाते असे नाही, परंतु आनुमानिक किंवा प्रत्यंतरी पुराव्याने ही निरसित होईल; आणि येणेकरून किती एक कजांत द्वंद्व करणारी अनुमानें उत्पन्न होतात.

 ७९. इंद्व करणाऱ्या अनुमानांचा बळकटीचे वजन करण्याविषयी पहिला साधारण नियम असा आहे की, विशेष अनुमाने, म्हणजे जी मुकदम्यांतील विशेष हकीकतीवरून उत्पन्न होतात ती, साधारण अनुमानांस रद्द करतात. उदाहरण, घातक हत्याराचा उपयोगावरून अकसाविषयों में विशेष अनुमान उत्पन्न होते, तेणेकरून निरपराधाविषयी जे साधारण अनुमान आहे ते रद्द होऊ शकेल.

 ८०. सृष्टीचा नित्य पाठांतल्या अनुक्रमावरून जी अनुमाने निघतात, त्यांस मोठे वजन दिले आहे. बलात्काराने स्त्रीसंभोगाचा किंवा इतर जबरीचा गुन्ह्याचा चार्जात आलेल्या मनुष्याचे वय व शक्ति यांपासून होणारी अनुमाने ही या जातीची आहे.

 ८१. शेवटी इतकें सांगणे आहे की, निरपराथाविषयींचा अनुमानास कायदा अनुकूळ असतो.