पान:प्रमाणशास्त्र.pdf/४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अनुमानें.

३३

मरणाविषयी अनुमान करील. परंतु काशीत पंधरा वर्षाची किंवा कदाचित् जास्त मुदत ठरवितात.

 ७३. एकाद्या नाहीशा झालेल्या मनुष्याचे मरण, त्याचा जन्मापासून नव्वद वर्षांनंतर मुसलमानी शास्त्र अनुमिते, मग ती मुदत भरण्यापूर्वील पांच वर्षांचा आंतही तो कोणाचा दृष्टीस पडला तरी चिंता नाही.

 ७४. मुसलमानी शराप्रमाणे, सतत दाम्पत्यसहवास, आणि जनकत्वाचा स्वीकार, ही लग्न आणि औरसपणा यांचा यथानुक्रमें पूर्ण आनुमानिक पुरावा होत.

 ७५. हिदु व मुसलमानी शास्त्रांतील सदरील अनुमाने सर्व निवार्य आहेत.

 ७६. सृष्टीचा क्रम, आणि मनुष्याचा व्यवहाराची परंपरा, यांचा साधारण अनुभवावरून नैसर्गिक अनुमाने किंवा घडलेल्या गोष्टींची अनुमाने उत्पन्न होतात; त्यांस कायद्यावरून बळकटी किंवा मूल्य माप्त होत नाही. यास्तव, सर्व काळी आणि सर्व देशी ही

अनुमानें बहुतकरून सारखीच असतात, आणि जशा जशा मनुष्याचा स्थिति निरनिराळ्या व पुष्कळ असतात, त्याप्रमाणे हीही नाना प्रकारची असतात.

 ७७. अपराधाचें अनुमान, म्हणजे उदाहरणार्थ,चोरीचा मालाचा नूतन कबजापासून अपराधाविषयी होणारे अनुमान, हे काही ग्रंथकारांनी कायद्याचा अनुमानाचा योग्यतेचे धरले आहे; परंतु जा पक्षी कज्जांतील घडलेल्या गोष्टींनी योग्य दिसेल त्या परतें