पान:प्रमाणशास्त्र.pdf/४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


३२
अनुमाने,

अपराधी ठरवून, फाशी दिले. नंतर ती मुलगी सांपडली तेव्हां तिणे सांगितले की, मी आपल्या चुलत्याचा घरांतून पळून गेल्ये होत्ये.

 ७०. हिंदु कुटुंबाचा रचनेवरून विरुद्ध शाबिती"होई तोपावेतो त्यामध्ये हिताचे ऐक्य असते असें"अनुमान उत्पन्न होते. यास्तव जो पक्षकार विभक्तपणाविषयी अपादन करीत असेल, त्यावर पुराव्याचा"बोजा पडतो.आगंतुक पुराव्याने जो विभक्तपणा स्थापित करावयाचा, त्या आगंतुक गोष्टी अशा असल्या पाहिजेत की, कुटुंबाचा विभक्तपणाचा स्थितीहून दुसऱ्या कोणत्याही निराळ्या स्थितीशी अगदी वि."परीत असतील.अविभक्त हिंदु कुटुंबाची सर्व मिळकत सामईक आहे,असे हिंदुधर्मशास्त्र अनुमिते. अशा कुटुंबांतील एकाद्याने पृथपणाने मिळवलेली मिळकत म्हणून दावा केल्यास त्या, गोष्टीची त्याजला शाबिती केली पाहिजे.याचप्रमाणे एकत्र भावांनी एकादा धंदा केल्यास, तो सामईक आहे, असें अनुमान होते.

 ७१. हिंदु शास्त्रावरून दत्तविधानाचे अनुमान होणार नाही. कपटाचा संशयापासून मोकळा आणि संशयाचे कारण उत्पन्न न होण्याजोगा संगतवार आणि संभाव्य अशा पुराव्याने त्याची शाबिती केली पाहिजे.

 ७२. एकादा मनुष्य बारा वर्षे परागंदा असून त्या विषयी खबर समजली नसली, तर हिंदुशास्त्र त्याचा