पान:प्रमाणशास्त्र.pdf/४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अनुमाने.

३१

किंवा नाहीसा केला,तर,पूर्वोक्त पत्रे वगैरे,दाबून ठेवणाऱ्या किंवा नाहीसा करणान्या पक्षकारास प्रतिकूळ होती, असें अनुमान केले जाईल.

 ६८.आणि जो पक्षकार अन्यायाने पुरावा नाहीसा करतो, किंवा दाबून ठेवितो, त्याविरुद्ध तेणेकरून कायद्याचे बळकट अनुमान जरी उत्पन्न होते,तरी पुरावा बनाविल्याने कायद्याचे अनुमान उत्पन्न होत नाही. परंतु जा घडलेल्या गोष्टींचा अनुमानास कायद्यावरून काल्पनिक वजन प्राप्त होत नाही, अशा घडलेल्या गोष्टींविषयों अनुमान उत्पन्न होऊ शकेल.

 ६९. परंतु फौजदारी कज्जांत घडलेल्या गोष्टींविषयीचे पूर्वोक्त अनुमान कैदीविरुद्ध लागू करणे तें फार सावधगिरीने लागू केले पाहिजे. कारण, एकादा निरपराधी मनुष्य ही आपल्या बचावाकरिता खोटा पुरावा बनावील; या बाबतीचा खाली लिहिलेला कजा लार्डकोक याणे वर्णिला आहे; तो असा.एका लहान मुलीचा चुलता तिचे पालिग्रहण करीत असे, आणि तिचा वारीसही तोच होता. एक्या दिवशी कांही गैरवर्तणुकीकरितां तो तिला मार देत होता, तेव्हां. "काका माझा माण घेऊं नको, " असे तिचे ओरडणे लोकांस ऐकू आले. त्यानंतर ती नाहींशी झाली. सेशन जजाने त्या लहान मुलीस हजर करण्याविषयी तिचा चुलत्याला हुकूम केल्यावरून त्याणे एका दुसन्या मुलीस तिचा सारखें सजवून नेलें, परंतु ती लबाडी उघडकीस आल्यावर पूर्वोक्त हकीकती.वरून त्याचा सदोषपणाचें अनुमान करून, त्यास