पान:प्रमाणशास्त्र.pdf/३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


३०
अनुमानें,

 कितीएक ठिकाणी काही विशेष गोष्टींवरून सात वर्षापूर्वी ही मनुष्याचे मरण अनुमित होईल. जसे,एकादा मनुष्य विलायतेहून गलबतांत बसून ईस्ट-इंडिया-बेटांकडे हंकारून गेला असून त्या गलबताचा थांग तीन वर्षेपर्यंत लागला नाही, असे झाले असतां पूर्वोत अनुमान होईल.

 ६७.जा पुराव्यावरून आणलेल्या कजाचे खर स्वरूप दिसून येईल,तो पुरावा एकाद्या पक्षकाराने अन्यायाने दाबून ठेविला तर कायद्यावरून त्याचा गैरहिताचे मोठे अनमान होईल: 'आरमरी विरुद्ध डिलामरी' या कज्जाने वरील नियमाचे स्पष्टीकरण होतें.सदरील कजांतील वादी हा एक गरीब मुलगा असून न्याजला एक मूल्यवान् जडावाचा दागिना सांपडला;न्याचा किमतीचा तपासाकरितां तो त्याणे प्रतिवादी हा एक सोनार, याजपाशी नेला. तो वादीने परत मागितला, तेव्हां प्रतिवादीचा चाकराने त्या दागिन्यां..वाल खडे काढून घेऊन नुसते कोंदण वादीस परत दिले. त्या वरून वादीने त्यांतील खड्यांचा दावा केला.जा पक्षी प्रतिवादीचा चाकराने अन्यायाने ते खडे दाबून ठेविले, त्या पक्षी त्यांची किम्मत करण्याकरिताते पहावयास मिळतना, तेव्हां चीफ जस्टिसाने जूरीस हुकूम केला की, तुम्ही जो वादी तर्फे ठराव कराल,न्यांत कोंदणांत बसावयाजोगे महत्तम किमतीचे खडे होते, असे अनुमान करावे. याच नियमाअन्वये,पत्रे आणि इतर दस्तऐवजी पुरावा हजर करण्याविषयी योग्य नोटीस झाली असतां अन्यायाने दाबून ठेविला,