पान:प्रमाणशास्त्र.pdf/३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२९

अनुमानें.

कारण अशा ठिकाणी,नैसर्गिक प्रीति, ही चांगली आणि पुरी सबब आहे,असें अनुमानिले आहे.

 ६४.लेंकराशिवाय एकाद्या मनुष्यास दिलेला पैका,पूर्वीचा कर्जाचा फेडीत दिला,असे समजलें जातें..

 ६५.सर्व वस्तु पूर्वी प्रमाणेच आपली स्थिति राखितात,असे कायद्याचे अनुमान आहे.उदाहरण,

मिळकतीचा कबजा,किंवा हुद्याचा सत्ताप्रकार,ही एकसारख्याच अवस्थेनें राहतात,असे अनुमान केलें जाईल;आणि त्याचप्रमाणे,पूर्वी वेड होते,असा पुरावा झाल्यास ते तसेंच चालत आले आहे,असें कायदा अनुमान करील; परंतु त्याविरुद्ध पुरावा सहजच करता येईल.कर्जाची फेड केली,किंवा मुदत चुकली किंवा त्या कज्जांतील इतर गोष्टींवरून फेड किंवा बेदावा झाल्याचे अनुमान होते,असे शाबीत होई पर्यंत,कर्ज चालू राहिले आहे,असे अनुमान करण्यांत येईल.

 ६६. याच नियमावरून एक वेळ जीवंत असलेला मनुष्य, अद्यापि जीवंत आहे, असे कायदा अनुमान करील; परंतु एकादा मनुष्य परागंदा होऊन सात वर्षेपर्यंत त्याची खबर नसल्यास, इंग्लंडांत हे अनुमान कायदा बंद करतो, आणि त्या वेळानंतर त्याचे मरण कायद्याने अनुमित होते; परंतु त्याचे मरण सात वर्षांचा आरंभी, किंवा मध्य भागी, किंवा शेवटी घडले याविषयी मुळीच अनुमान निष्पन्न होणार नाही.