पान:प्रमाणशास्त्र.pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२८
अनुमानें.

घेण्याचा हेतूचे कायदा अनुमान करतो; आणि एकाद्या कृत्याचा संभाव्य परिणाम ठकविण्याचा असल्यास त्या कृत्यावरून ठकविण्याचा हेतूचे अनुमान होतें.सात आणि बारा वर्षांचा दरम्यानचा वयाचें मूल कोणताही अपराध करण्यास नालायक आहे, असे अनुमान कायदा करतो; परंतु विवक्षित प्रसंगी आपल्या वर्तणुकेचे स्वरूप आणि परिणाम यांचा विचारकरण्या पुर्ती त्या मुलामध्ये बुद्धीची मौढि प्राप्त झाली आहे, असे दाखवून त्या पूर्वोक्त अनुमानाचे निवारण करतां येईल (पीनल कोड कलम ८३)

 ६०. जमिनीचा किंवा घराचा मालकापासून भाडोत्र्याने भाड्याबाबद पावती घेतली असल्यास,त्याला त्या पूर्वीचे कांही भाडे देणे राहिले नाही असें कायदा अनुमान करतो.

 ६१.स्त्री पुरुषांचा लग्नसंबंध असतां झालेलें मूल औरस आहे,असे कायदा अनुमितो;परंतु आई.बापांचा दरम्यान व्यवहार घडला नाही, अशा शाबितीनें पूर्वोक्त अनुमानाचे निवारण होईल.

 ६२. मनुष्यजातीचा साधारण शक्ति प्रत्येकमनुष्याचा अंगी आहेत, असे कायद्यावरून अनुमान होते; यास्तव खूळ, वेड, बहिरेपणा, व पौरुषाभाव आणि इतर शारीर व्यंगें, यांचे कधीं अनुमान करण्यांत येणार नाही, [ म्हणजे ही शाबीत केली पाहिजेत ].

 ६३. बापाने आपल्या लेकरास दिलेला पैका बक्षीस आहे, उसनवार नाही, [असें अनुमित आहे].