पान:प्रमाणशास्त्र.pdf/३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२७

अनुमाने.

सर्व कजांत अकसाची शाबिती केली पाहिजे. उदाहरण, "ठार मारणे, हे सहजच प्रथमदर्शनी गैरकायदा आहे, सबब खुनाचा प्रत्येक चार्जात प्राण घेण्याचा गोष्टीचा प्रथम पुरावा झाल्यास कैदीविरुद्ध जो पुरावा दाखल झाला असेल त्यावरून दैवयोग, किंवा अनिवार्यता, किंवा व्यंग, यांचे सर्व प्रकार पुराव्यांतून उत्पन्न होत नसल्यास त्याज विषयींखातरीलायक शाबिती कैदीने केली पाहिजे.कारण विरुद्ध शाबिती होई तोपर्यंत ती गोष्ट अकसाने झाली असे कायदा अनुमितो."

 ५८. कायद्यांतील 'अकस' या शब्दाचा अर्थावरून, कोणा विवक्षित मनुष्याविरुद्ध दुश्मनी, असा अर्थ होत नाही; कोणतेही बुद्धिपुरःसर केलेलें अयोग्य कृत्य अकसाने झालें असें अनुमित आहे,जरी त्या कृत्यापासून नुकसान होणाऱ्या मनुष्याविषयी ते कृत्य करणाराची दुर्बुद्धि नसली तरी चिंता नाही. उदाहरण,एका मनुष्याने अचा माण घेण्याचा इराद्याने बचा माण घेतला, तरी तो खुनाचा अपराधी आहे; तसेंच,एका मनुष्याकरितां विष घालून ठेविलें असतां ते खाऊन दुसरा मेला, तरी तसाच गुन्हा होतो.

 ५९. सदसद्विचारक्षमवयाचा अविक्षिप्त मनुष्य आपल्या कृत्यांचा नैसर्गिक किंवा संभाव्य परिणामाचा हेतु धरून ते कृत्य करतो, असे कायद्यावरून अनुमान आहे; यास्तव एकाद्या घातक हत्याराचा बुद्धिपूर्वक आणि तडाक्याने उपयोग केला असतां, माण