पान:प्रमाणशास्त्र.pdf/३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अनुमानें.

२५

कोडतांनी, किंवा माजिस्टेटांनी केलेल्या फैसलनाम्याचा शुद्धपणाविषयी हे अनुमान खरोखर केव्हांकेव्हां निश्यायक असते, असें आपणास पुढे कळेलच.आणि याच सबबेवरून इनसाफाचा कोडताची सर्व दफ्तरें, आणि कायद्याने ठरविलेली सर्व सरकारी रजिस्टरें, हीं शुद्ध आहेत, असे कायदा अनुमान करतो.

 याच उद्देशाने अनीति, किंवा गैरवर्तणूक, किंवा कपट, ही कायद्याने अनुमित होत नाहीत.

 आणखी बिनहुद्याचा माणसाचा व्यवहारास कित्येक प्रसंगी हाच नियम लागू आहे. उदाहरण,पुरातन खत, किंवा मृत्युपत्र, ही योग्य रीतीने पुरी झाल्याविषयीं, किंवा पुरातन पत्रे, नोंदण्या आणि पावत्या इत्यादिकांचा खरेपणा व असलपणाविषयीं,कित्येक प्रसंगी कायदा निश्यायक अनुमान करतो (या ग्रंथाचे कलम २०२ पहा ); आणि जो आयातीचा किंवा निर्गतीचा माल मांडवीत नोंदलाच पाहिजे, तो माल योग्य रीतीने नोंदला आहे, असें अनुमान आहे; आणि निरपराधाविषयींचा अनुमानाचाया अनुमानाशी किती निकट संबंध आहे, हे अशा उदाहरणावरून दिसून येते.

 बिल्ल-आफ्-एकश्यें व प्रामिसरी नोटी ही चांगल्या व पुरत्या सबबेनें लिहून दिली आहेत, असे इंग्रेजी कायदा प्रथमदर्शनी अनुमितो, परंतु निश्चयात्मक अनु.मित नाही; म्हणून त्या अनुमानाविरुद्ध शाबिती केली

(४ ) बिल आफ एक्य म्हणजे हुंडी. त०,
(५) प्रामिसरी नोट म्हणजे वायदेचिठी. त०