पान:प्रमाणशास्त्र.pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२४
अनुमानें.

 ५५. कायद्याचा निवार्य अनुमानांपैकी निरपराधतेविषयी जे कायद्याचे अनुमान आहे ते बलवत्तम आणि विलक्षणतम आहे. प्रत्येक मनुष्य, तो अपराधी आहे, असें शाबीत होईपर्यंत, तो निरपराधी आहे, असे कायद्याचे अनुमान आहे. हे अनुमान इतकें ढिले सोडलेले आहे की, ज्या घडलेल्या गोष्टीन केल्याने अपराध होतो त्या गोष्टी पुरत्या केल्या आहेत असे अनुमान करण्यांत येते. उदाहरण,विलियम्स विरुद्ध इस्ट इंडिया कंपनी, या कज्जांत वादीने फिर्याद केली की, प्रतिवादीचा अखत्याच्याने मालाचा गुणाविषयी कायद्यावरून जी खबर अवश्य दिली पाहिजे होती, ती न देतां, आपल्या गलबतांत शीघ्रज्वालाग्राही पदार्थ घातला तेणेकरून गलबत जळाले; या कजांत प्रतिवादीचा अखत्याऱ्याचा निरपराधीपणास अनुकूल अनुमान करून, योग्य खबर दिली होती, असे अनुमान करण्यांत आले; आणि,खबर दिली नव्हती, अशी शाबिती वादीकडून झाली नाहीं सबब तो दाव्यांत हरला.

 ५६. सर्व गोष्टी शुद्ध रीतीने आणि योग्य प्रकाराने केल्या आहेत, असे कायदा अनुमान करतो; हे एक आणखी कायद्याचे वचन आहे. कायदा गैरशिस्तपणाचे अनुमान करीत नाही; हा नियम सरकारी अम्मलदारांचा सरकारी नात्याने केलेल्या कृत्यास प्रथम लावितात, आणि, ती गैरशिस्त रीतीने केली आहेत. असे शाबीत होईपर्यंत ती शुद्ध रीतीने केली आहेत, असे अनुमान कायदा हमेशा करतो. न्यायाचा