पान:प्रमाणशास्त्र.pdf/२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


प्रतिवेध.


मुकदम्यांत सर्व प्रकारची चौकशी केली जाईल, आणि त्या पूर्वीचा निवाड्याचा विचार मात्र करता येईल.

 ४३. परंतु प्रख्यातीचा विषयाने केलेल्या प्रति.बंधांस हा नियम लागू होत नाही; ते विषय जाबजबाबांत घालण्याची जरूर नाही, आणि पुष्कळ कजांमध्ये ते नीट रीतीनें जाबजबाबांत घालताही येत माहींत. असे प्रतिबंध जाबजबाबांत नसले तरीही जरीला न्यांवर लक्ष द्यावे लागते.

 ४४. आपली अपरुति, अपराध, किंवा कपट,यांपासून आपले हित करून घेण्याची कायद्याने मनाई केली आहे; आणि या कारणास्तव एकादा अनीतीचा, किंवा गैरकायदा करार, दिवाणी मुकदम्याचा द्वाराने पुरा होण्याचा प्रतिबंध होतो. त्याप्रमाणे,राजा राजनारायण विरुद्ध जगन्नाथमसाद मलिक आणि दुसरे, या कज्जामध्ये कलकत्ता सदर दिवाणी अदालतीने असा ठराव केला की, जा पक्षकाराने आपली मिळकत आपल्या धनकोस ठकविण्याकरितां बाझाकाराने दुसऱ्यास स्वत्वनिवृत्तिपूर्वक दिली,त्या जला नंतर ती मिळकत, स्वन्वनिवृत्ति खरोखर केली नव्हती, अशा सबबेर्ने परत घेऊ शकवत नाही.आतां कोडताने असा दावा घेण्यास नाकबूल केल्याने त्या करारास जो दुसरा पक्षकार असून वादी- प्रमाणेच अपराधी असेल त्याचा फायदा होऊ, परंतु अनीतीचा दावा तपासण्याचा नाकबूल करून कोर्टात येण्यापूर्वी जा अवस्थेत ते पक्षकार होते त्याच अवस्थेत त्यांस राहूं देणे, हे करणे कोर्रास वाजवी आहे.