पान:प्रमाणशास्त्र.pdf/२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२०
अनुमाने

 ४५. घडलेल्या गोष्टींवरून जो तर्क किंवा सिद्धान्त निघतो न्यास 'अनुमान' असे म्हणावें. अनुमान करण्यांत जा घडलेल्या गोष्टी माहीत असतात त्यांवरून एतावत्पर्यंत एकादी गोष्ट माहीत नाही अशी असल्ये ती आपण तर्कसिद्ध करितो. जर मध्यरात्री परकीय मनुष्य आपल्या खोलीत आपणास अढळला,तर तो चोरी करण्याकरितां आला आहे, असें अनुमान उत्पन्न होते; आणि कोणी मनुष्य कांही घातक हन्यारे घेऊन असला तर आपणास ठार मारण्याचा,किंवा शरीरास क्लेशकारक दुखापत करण्याचा त्याचा इरादा आहे, असें तर्क सिद्ध करता येईल,किंवा असे अनुमान उत्पन्न होईल. आगंतुक पुराव्याचा सदरा खाली अनुमानाविषयी आणखी उदाहरणे सांपडतील.

 ४६. कितीएक मुकदम्यांत अमुक घडलेल्या गोष्टींपासून, कायदा हा कृत्रिम अनुमान उत्पन्न करतो, किंवा निदान जा स्वाभाविक अनुमानावरून तें कृत्रिम अनुमित करण्यांत येते त्या स्वाभाविक अनुमानानें जो मनावर ग्रह होतो त्यास सोडून त्या स्वाभाविक अनुमानास मनःकल्पित बळकटी आणि योग्यता देतो. याविषयी बहुतकरून फिर्यादीचा मुदतीचा कायद्याविषयीचे उदाहरण देतात. सन १८५९ चा आक्ट १४ कलम १ रकम ८ यांत, किरकोळीने विकलेल्या जिनसाची किंमत वसूल करण्याचा फिर्यादीचा हक्कास तीन वर्षांची मर्यादा ठरविली आहे.