पान:प्रमाणशास्त्र.pdf/२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८
प्रतिबंध..


"होती, असे पहिल्या मनुष्याचाने दुसन्याचा सामने "उभे राहून म्हणवत नाही."

 ४१. जा मनुष्याने जो मजकूर कळविला, तदनुसार कृति घडावी या हेतूने तो त्याणे कळविला म्हणजे 'बुद्धिपुरःसर' कळविला असें म्हणावें;असा वरील वाक्यांत 'बुद्धिपुरःसर'या शब्दाचा अर्थ होय. उदाहरण,“कोणी स्त्री आपली पत्नी आहे, अशी “संपादणी करून तिजला माल देण्यास एकाद्या व्यापान्यास कोणी मनुष्याने प्रवृत्त केल्यास, त्या संपादणीचा योगेंकरून त्याचे तोंड बंद होऊन, ती आपली पत्नी नव्हती, असे दाखविणे त्याकडून पुढे मान्य होणार नाही."

 ४२. सरकारी दफ्तराने किंवा खताने कोणता.ही प्रतिबंध असल्यास, तो जाबजबाबांत उल्लेखित असला पाहिजे, आणि त्याचा उक्तीची सवड असतां जर लो जाबजबाबांत दाखल केला नसेल, तर तेणेंकरून 'जूरी' म्हणजे पंच निश्चित बांधले जाणार नाहीत; परंतु, त्या गोष्टीचा त्यांणी पाहिजे तर पुढे विचार करावा, असा इंग्रेजी कायद्याचा नियम आहे.उदाहरण, त्याच बाबतीविषयी आणि त्याच पक्षकारांचा दरम्यान पूर्वी निवाडा झाला असून जाबजबाबांत जर त्यावर भरवसा ठेवून त्याविषयी लिहिले, तर त्या कज्जांतील इतर सर्व पुराव्याची शाबितीनाशाबिती पहाण्याचा प्रतिबंध होईल. परंतु जर पूर्वीचा निवाड्याची उक्ति जाबजबाबांत नसेल, तर त्या

(3) इंग्लंडांत दिवाणी खटल्यांतही जूरी असत्ये. त.)