पान:प्रमाणशास्त्र.pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रतिबंध..

१७


 ३८. (३), साधारण प्रख्यातीचा विषयाने प्रतिबंध.- एकाद्याचा गांवीं, किंवा त्याचा शेजारी साधारणतेने माहीत असलेल्या, आणि फारशी चौकशी केल्यावांचून सहज समजण्याजोग्या कृत्यांस,पूर्वी, साधारण प्रख्यातीचे विषय, असे म्हणत असत असे दिसते.

 ३९. जी कृत्ये प्रख्यात लौकिकाची नाहीत,त्यांचा समावेश होण्याजोगा प्रतिबंधांचा वर्ग आलीकडे वाढला गेला आहे. याविषयी स्टार्की याणे असा साधारण नियम लिहिला आहे की, “जर कोणी "मनुष्य कोणत्याही रुत्यास संमति देईल, आणि त्यापासून हक्क मान करून घेऊन उपभोगील, तर, तें कृत्य न्याचानें सदोष म्हणवत नाही.” उदाहरण,भाड्याची बाकी वसूल करण्याचा दाव्यांत, ज्या जमिनीचा धन्याचा हक्कावरून आपणास जमीन भाड्याने मिळाली त्या धन्याचा मालकीविषयी वाद सांगण्याचा भाडोत्री यास प्रतिबंध आहे.

 ४०. आणखी, एका कजामध्ये लार्ड डेन्मन याने असा नियम स्थापिला आहे की, " एकादा मनुष्य आपल्या शब्दाने किंवा वर्तणुकीने काही गोष्टींची अवस्था अमुक मकारची आहे, असा भरवसा दुसन्याचा मनांत बुद्धिपुरःसर उत्पन्न करून आणि त्या भरवशाप्रमाणे चालण्यास न्यास उद्युक्त करून त्या कृत्याने त्याचा पूर्वीचा स्थितीत बदल करील,

"तर, त्याच वेळी, त्या गोष्टीची अवस्था निराळी

( २ ) एक इंग्लिशू धर्मशास्त्री. त०