पान:प्रमाणशास्त्र.pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१६

प्रतिबंध.

 न्यायाचा कोडताचा निवाड्यापासून होणारी काय दुसऱ्या जागी लिहिण्यांत येतील, आतां एथें इतकें सांगणे बस आहे की, जर एकाद्या पक्षकारावर एकादा निवाडा निश्यायक असेल तर त्या निवाड्यावरून फिर्यादीत तोच मुद्दा उत्पन्न करण्याची त्याजला मनाई होत आहे. याचप्रमाणे प्लीडिंगांत, म्हणजे जाबजबाबांत, एका पक्षकाराने लागू गोष्टींचे दृढकथन केले असून त्या गोष्टी प्रतिपक्षकारानें कबूल केल्या असतील, किंवा काही दुसऱ्या गोष्टींवर तेढेपणा घेऊन अप्रत्यक्ष रीतीनें कबूल केल्या असतील, तर जा पक्षकाराने तेढेपणा घेतला. असेल तो तेढेपणात्याचा विरुद्ध ठरल्यास मात्र त्या गोष्टींचा त्याच पक्षकारांचा दरम्यान पुनः वादविवाद होईल, नाही तर होणार नाही, आणि त्या गोष्टी त्या पक्षकारांचा दरम्यान निश्यायक पुरावा समजल्या जातील.

 ३६. जाबजबाबांतील गोष्टी पूर्वीचा जाबजबाबाशी विरुद्ध असल्यास त्या चालू नये, असा मुस-लमानी शरेचा इरादा दिसतो.

 ३७. (२), खताने प्रतिबंध.- शिक्कयानिशीं खत पुरे करून देणे, हे इंग्रेजी कायद्यांत इतके गंभीर व विचारपूर्वक कृत्य मानले आहे की, कोणा मनुष्या- स अशा स्वतांचा खताविरुद्ध एकादी गोष्ट शाबीत करण्याचा किंवा मजकूर सांगण्याचा प्रतिबंध आ- हे. परंतु त्या खतावरून तर्काने अनुमित किंवा गृ. हीत गोष्ट असून तिजविषयी जर त्या खतांत प्रत्यक्ष उक्ति नसेल, तर तिला वरील नियम लागू पडत नाही.