पान:प्रमाणशास्त्र.pdf/२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१५


प्रतिबंध.

 ३३. आपल्या पूर्वीचा खताविरुद्ध, म्हणण्यावि.रुद्ध, किंवा जा निवाड्यास तो पक्षकार असेल त्या निवाड्याविरुद्ध वाद सांगण्यास त्या पक्षकारालदी असत्ये, त्या बंदीस 'प्रतिबंध' असे म्हणावें.

 ३४. इंग्रेजी कायद्याप्रमाणे मतिबंधाचा जाति तीन आहेतः-(१) सरकारी दफ्तरांतील विषयाने;(२) खतानें; (३) साधारण प्रख्यातीचा विषयाने;असे तीन प्रकारचे प्रतिबंध आहेत.

 ३५. (१), सरकारी दफ्तरांतील विषयाने प्र- तिबंध.- न्यायाचा कोर्गचे दफ्तर काळजीने व ख- चितपणाने लिहिलेले असते, असे शास्त्राने अनुमित आहे; आणि, वादाचा शेवट व्हावा यास्तव तें दफ़्तर खरे आहे, असें, शास्त्र निश्चयान्मक अनुमान करते; आणि पुढे सांगितले आहे त्याममाणे जा निवाड्यांत तो मनुष्य पक्षकार किंवा संबंधी नसतां त्या निवा- ख्यांत जा बाबतींचा निर्णय झाला असेल तेवढ्या खे- रीज करून, कोणासही त्या विरुद्ध शाबिती करण्या- चा अधिकार कायदा देत नाही. उदाहरण, कज्जा योग्य रीतीने चालविला होता, असें दफ्तरावरून दिसून येत असल्यास, जो मनुष्य न्यांत पक्षकार असे- ल त्यास त्या गोष्टीचा विरुद्ध वाद सांगता येत नाही; किंवा एकादी जबानी अशुद्ध रीतीने दफ्तरांत लिहि- ली आहे, असे दाखविण्याचा पुरावा घेतला जाणार नाहीं ( या ग्रंथाची कलमें ३४८, ३५७ व ३५८ पहा).