पान:प्रमाणशास्त्र.pdf/२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४

पुराव्याचा बोजा.

"असेल तेव्हां अशा ठिकाणी त्याचा दाव्याचा आधा-"रास त्या नास्तिपक्षाची शाबिती आवश्यक आहे,"म्हणून अशा प्रत्येक खटल्यांत" त्याणे तें नास्तिपक्षकथन शाबीत केले पाहिजे.

 ३१. जर एकाद्या पक्षकारास अनुकूळ असें निवार्य अनुमान कज्जांत उत्पन्न हाईल, तर त्या यो- गानें सामनेपक्षकारावर पुराव्याचा बोजा पडेल. जसें, साधारण अनुमानाने मनुष्य निर्दोष आहे, म्ह. णून, अमुकाने गुन्हा केला आहे, असे कोणी म्हणत असल्यास शाबितीचा बोजा तसे म्हणणारावर पडतो. सर्व व्यवहार चोख आहे, असें अनुमान कुम आहे, म्हणून, अमुक ठिकाणी लबाडी झाली आहे, असे कोणी म्हणेल तर असे म्हणणारावर त्याचा शाबिती- चा बोजा पडतो; आणि कोणताही रोखा चांगल्या

व पुऱ्या सबबेने लिहून दिला असतो, असें अनुमान आहे, म्हणून, ती सबब नाकबूल करणाऱ्या पक्षकारावर पुराव्याचा बोजा पडतो.

 ३२. जर कोणतीही गोष्ट पक्षकारांपैकी एका. चा विशेष माहितीतील असेल, तर ती त्याणे शाबीत केली पाहिजे असे दिसते. उदाहरण, परवान्यावांचू. न दारू वगैरे विकण्याबदलचा खटल्यांत, आपणापाशी परवाना आहे, म्हणून प्रतिवादीचे म्हणणे असल्यास त्याची शाबिती न्याणे केली पाहिजे; परंतु असें ठर- विण्यांत आले आहे की, अशा खटल्यांत प्रतिवादी याजवर पुराव्याचा बोजा पहण्यापूर्वी अशा कज्जां- तून प्रथम फिर्यादीकडून काही पुरावा आला पाहिजे.