पान:प्रमाणशास्त्र.pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१3


पुराव्याचा बोजा.

 २९. जो पक्षकार मुद्याविषयी वस्तुतः अस्तिप- क्षस्थापक बोलणे बोलतो, त्याजवर पुराव्याचा बोजा पडावा, असा साधारण नियम आहे. परंतु वस्तुतः जो अस्तिपक्ष असतो तो वारंवार नास्तिपक्षाचा स्व- रूपाने आढळण्यांत येतो, आणि यामुळे पुष्कळ गों-

धळ उत्पन्न होतो.

 ३०. खाली लिहिलेला नियम, हा वहिवाटीस अधिक सुलभ आहे. तो असा की, कोणत्याही प- क्षाकडून अधिक पुरावा न झाला असतां, अथवा शाबीत करावयाची दृढकयने जाबजबाबांतून, म्हण. जे प्लीडिंगांतून, काढून टाकिली असतां, जो पक्षकार हरण्याजोगा असेल त्यावर पुराव्याचा बोजा पडेल. उदाहरण, जमीन कबजांत घेण्याविषयींचा दाव्यांत जा मनुष्याचा हातून कबजा गेला असेल त्यावर पुरा- व्याचा बोजा पडतो. तसेच घरास दुरुस्ती न केल्या- बदल घरधनी याणे आपल्या भाडोच्यावर फिर्याद के- ली असतां, जर भाडोत्री ती गोष्ट नाकबूल करील, तर, त्याणे आवश्यक दुरुस्ती केली नव्हती, हें घरध- न्यास शाबीत केले पाहिजे. कारण, जरी हे दृढ- कथन व्याकरणदृष्टीने नास्तिपक्ष आहे, तरी, जर ते दृढ़- कथन फिर्यादीतून काढून टाकिलें, किंवा दोही पक्षां- कडील पुरावा आला नाही, तर वादी हरेल. "आणि “याचप्रमाणे जा कज्जांत वादी आपला फिर्यादीचा "हक्क नास्तिपक्ष दृढकथनाचा आधाराने मागत