पान:प्रमाणशास्त्र.pdf/२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२

पुरावा मुद्याला धरून असावा.

शब्दांविषयीं, किंवा भीति घालणारे पत्र पाठविल्याविषयींचा खटल्यांत कैदीने दुसरे अब्रू घेणारे मजकूर,व पत्रे लिहिली होती, हा पुरावा ग्राह्य आहे.

 २७. सदरी सांगितलेल्या प्रत्येक प्रकारचा क- ज्जांत,कज्जाबाहेरील घडलेल्या गोष्टींचा पुरावा ग्राम आहे; कारण, त्या गोष्टी तंट्यांतील मुद्यांचा खुलासा

करण्याचा उपयोगी पडतात.

 २८. मसलतीचा खटल्यांत, दुसऱ्या मसलतदा- रांची कृत्ये आणि साङ्केतिक बोलणी, ही निराळ्या कारणामुळे ग्राह्य आहेत. जेव्हा एकाच गैरका. "यदा कामाकरितां पुष्कळ लोक एकत्र झाल्याची "शाबिती होत्ये, तेव्हा मूळचा घाटलेल्या बेताला अ- "नुसरून आणि सर्वांचा साधारण हेतशी संबंध राखून "त्या टोळीपैकी एकाद्याने कोणतेही कृत्य केले तर "ते कृत्य कायद्याचा दृष्टीने आणि त्याचप्रमाणे वास्त- “विक विचारे पाहूं जातां त्या सर्व टोळीचे होय, असे "ग्रहण करण्याचा नियम आहे; आणि या कारणा- "स्तव, अमुक व्यवहारांत कैदी हा सामील होता, "याची शाबिती झाली आहे किंवा नाही ही गोष्ट "लक्षांत न आणितां त्या साधारण मसलतीत जे अस- "तील त्यांतून कोणाही विरुद्ध सदरील कृत्याची शा. "चिती पुरावा होईल."