पान:प्रमाणशास्त्र.pdf/१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



पुरावा मुद्याला धरून असावा,

जेथे जागा असेल, तेथे त्याचा चांगल्या अब्रूविषयीचा पुरावा उपयोगी पडेल; परंतु जेथें त्याचा अपराध उघड असेल, तेथें तो पुरावा बहुधा उपयोगी नाही.

 २१.कैदीने आपल्या चांगल्या अब्रूविषयी साक्षीदार दिले असल्यावांचून, तो वाईट अब्रूचा आहे,असें शाबीत करण्यास खटला चालविणाराला साधारणतःपरवानगी मिळत नाही.

 २२.जी चौकशी होणे, तिचा चार्जाचा संबंधस्वरूपाशी असला पाहिजे, म्हणून फिलिप्स् याणे लिहिले आहे, "चोरीचा चार्जाचा खटल्यांत कैदीचा राजनिष्ठपणा अथवा भूतदया यांविषयी चौकशी करणे अप्रासंगिक व असंबद्ध होय; तसेच,"राजद्रोहाचा चार्जात त्याचा घरगुती व्यवहारांतील

"प्रामाणिकपणाविषयी आणि कालनिष्ठेविषयी चौकशी करणे असंबद्ध होय."

 २३. कज्जाबाहेरचा गोष्टींवरून, एकादा भिन्न साहसिक अपराध आहे, असे शाबीत होण्यासारखें असेल तरी फौजदारी चार्जीचा खटल्यांत साधारणतेने त्याची शाबिती करता येणार नाही; तथापि, जेव्हां पुष्कळ निरनिराळे साहसिक अपराध मिळून एक व्यवहार होण्याजोगा त्यांचा परस्पराशी सबंध असेल, तेव्हां, त्यांपैकी एक केल्याबदलचा चार्जीत त्या सर्वाविषयी पुरावा व्यावा; कारण, तसे न झाले तर

तो व्यवहार बरोबर रीतीने समजण्यांत येणार नाही.

 २४. याच कारणावरून सापराधज्ञान, अकस, किंवा हेतु शाबीत करण्याकरितां मुकदम्या बाहेरील