पान:प्रमाणशास्त्र.pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



पुरावा मुद्याला धरून असावा.

आणि बलात्काराने संभोग करणे, किंवा फितवून नेणे,या बाबतचा फिर्यादीत,त्या स्त्रीचा पूर्वीचा पातित्रत्याची चौकशी ही बहुधा प्रासंगिक आहे.कारण,जरी त्या चौकशीत कज्जाबाहेरील मुद्दा उत्पन्न होतोसा दिसतो,तरी तो, अपराध घडल्याचा संभव आहे की नाही, याचा निर्णयास लागू पडेल.

 १९. सर्व चौकशीत अजूचा जो पुरावा असेल, तो त्या मनुष्याचा साधारण लौकिकास धरून असला पाहिजे;म्हणजे, तो मनुष्य मामाणिक आहे, असा साधारण बोलवा आहे, इत्यादि प्रकारचा असला पाहिजे.

 साक्षीदारांनी त्या मनुष्याचा वर्तणुकीविषयी स्वतांचा अनुभवावरून बोलूं नये, आणि विवक्षित घडलेल्या गोष्टी बोलतांच नये; कारण, असा पुरावा अग्राह्य आहे तथापि, राबिन्स् याचा कजांत जशी परवानगी दिली त्याप्रमाणे, बलात्काराने संभोग केल्या-चा चार्जाचा खटल्यांत, त्या स्त्रीने आणखी दुसऱ्या परुषांशी संग केला होता, असें शाबीत करता येईल.

 २०. कोणताही गुन्हा किंवा अपराध याची चौकशी चालली असतां, कैदीला आपल्या साधारण अब्रविषयी साक्षीदार हमेशा बोलावितां येतील; परंतु,खाटी वजने ठेवणे, परवान्यावांचून दारू विकणे,आणि असेच दुसरे हलके गुन्हे, जांत अबचा प्रश्न येत नाही, अशा फियोंदींत गुन्ह्याची शिक्षा देण्याचा हेत नसून फक्त काही दंड घेणे असतो, म्हणून तेथे कैदीचा अब्रूविषयींचा पुरावा अग्राह्य म्हणून टाकूनदेतात. कैदीचा अपराधीपणाविषयी संशय घेण्यास