पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 नक्षलवादी आता झारखंड, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश एवढ्या उत्तर ते दक्षिण सलग प्रदेशात मोर्चेबांधणी करून आहेत. कम्युनिस्टांचा डाव उघड आहे.१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यापासून दूर राहून, इंग्रजांना पाठिंबा देणारे साम्यवादी, १९६१ मध्ये चीनचे आक्रमण होत असताना, 'आमार चेअरमन, चेअरमन माओ' अशा उघड घोषणा देणारे कम्युनिस्ट यांच्या लेखी 'राष्ट्र' या संकल्पनेचे काहीच पावित्र्य नाही. स्वातंत्र्यानंतर इंग्रजांनी दिलेले स्वातंत्र्य स्वातंत्र्यच नव्हे; खरे स्वातंत्र्य 'नाही रें'च्या सशस्त्र उठावानेच येईल असा कॉम्रेड रणदिवे यांचा सिद्धांत होता. इंदिरा गांधींच्या काळात हा रणदिवे सिद्धांत कम्युनिस्टांनी बाजूला ठेवून, काँग्रेसशी सोयरिक केली होती; पण इंदिरा गांधींच्या संख्याबळामुळे ते काँग्रेसला नमवू शकत नव्हते. इंदिराजींच्या सूनबाई सोनियाजी यांच्याकडे असे लोकसभेतील मतबाहुल्य नाही. कम्युनिस्ट त्यांना, पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनाही आपल्या तालावर नाचवीत आहेत. भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर, कामगार कायदे, परदेशी गुंतवणूक, किरकोळ विक्रीची व्यवस्था आणि महागाई अशा प्रश्नांवर काँग्रेसवर टिकेचे आसूड ओढायला कम्युनिस्ट नेते कमी करत नाहीत. त्यांच्यातील एका नेत्याला, 'संपुआ कामगारविरोधी धोरणे आखते तर तुम्ही त्यांचा पाठिंबा काढून का घेत नाहीत?' असे विचारले असता, 'आम्ही काय करतो आहोत ते आम्ही चांगले समजून आहोत', असे त्यांनी उत्तर दिले. याचा अर्थ उघड आहे. समाजसत्तावादी कम्युनिस्ट 'आम आदमी'वादी काँग्रेसचा उपयोग करून भारताला पुन्हा कम्युनिस्ट बनवू पाहत आहेत; एवढेच नव्हे तर, शिल्लक कम्युनिस्ट देश - क्यूबा, व्हेनेझुएला - यांच्या तुलनेत भारतात साम्यवादाचे केंद्रस्थान उभारू पाहत आहेत. सध्याच्या नक्षलवाद्यांनाच गणवेश दिले, की कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्याकडेच सोपवून अगदी स्टॅलिनवादी कम्युनिस्ट व्यवस्थासुद्धा राबवता येईल अशी त्यांची व्यूहरचना आहे.
 जम्मू-काश्मिरबद्दलचे संपुआचे धोरणसुद्धा असेच बोटचेपे आहे. तेथील आतंकवादी मुसलमान नेते मन चाहेल तेव्हा पाकिस्तानात जातात, त्यांच्या राष्ट्रध्यक्षांशीही बोलणी करून येतात; नियंत्रणरेखा पार करून किंवा एरवी खुले आम अनेक पाकिस्तानी हिंदुस्थानात येतात आणि नाहीसे होतात. येथून अनेक मुसलमान तरुण लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात सर्रास जातात व परत येतात. काश्मिरमध्ये हर दिन विस्फोट होत आहेत आणि तरीही, तेथून भारतीय फौजा काढून घेण्यास संपुआ सरकार संमती देते. खुद्द संसद भवनावर

पोशिंद्यांची लोकशाही / ३१८