पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६) कुटुंबाचा विस्तार होत जाण्यावरच कुटुंबाची अभिवृद्धि अवलंबून आहे. यास्तव कुलवृत्तान्तांत जितकी घराणीं नमूद असतील त्यांतील किती घराण्यांची स्थावर जिदगी त्या त्या ठिकाणी आहे हे कळणें जरूर आहे. नाहीतर पोटाच्या पाठींस लागून झालेला विस्तार हा टिकाऊ न ठरतां ‘कूर्मोगानीव सर्वशः' या न्यायाने कालान्तराने संकुचित होत जातो. पेंडसे घराण्यांतील बहुसंख्य व्यक्ति मुंबई, पुणे, ही शहरे आणि रत्नागिरी व कुलाबा हे जिल्हे यांत वास्तव्य करीत आहेत. परंतु मुंबईत स्वतःचे घर एकाचेहि नाहीं व पुण्यास ५५ कुटुंबांपैकी अवध्या ८ कुटुंबियांना स्वतःचे राहाते घर आहे; उलटपक्षी रत्नागिरी व कुलाबा या जिल्ह्यांत राहाणारांना स्वत:चे घरदार असणारच, त्यामुळे त्या जिल्ह्यांतील पेंडसे कुटुंबीयांची वस्ती स्थायी राहणार आणि मुंबई व पुणे यांतील वस्ती वाढणे वा घटणे हे परिस्थितीवर अवलंबून राहणार हे उघड आहे. । आतांपर्यंत चित्तपावन कुलांचे जेवढे वृत्तान्त प्रसिद्ध झाले त्यावरून पाहतां फारतर जुन्यांत जुनी नांवें १८ पिढ्या पर्यंतची सांपडू शकतात एकेक पिढी २५३० वर्षांची धरल्यास ४ शें ते ५ शे वर्षांपूर्वीपासूनची वंशावळ मिळालेली आढळते. त्या माहितीवरून प्रत्येक घराण्याचे मूळचे ठिकाण ठरविण्यांत आले आहे. परंतु त्या ठिकाणी तरी तो मूळ पुरुष कोठून आला ? तो कांहीं आकाशांतून अलगत त्या ठिकाणी येऊन उतरला नाहीं ! त्याचेहि कोणी पूर्वज असणार आणि भाऊबंदहि असणारच. तेव्हां कोंकणस्थ हे देशांतून कोंकणांत गेले का कोंकणांतून देशांत आले, दक्षिणेतून उत्तरेकडे पसरत चालले का उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत आले, परदेशांतून हिंदुस्थानांत आले का हिंदुस्थानांतून परदेशांत जाऊन परत आले इत्यादि ज्या कित्येक कल्पना मूलस्थानासंबंधाने अनेक ग्रंथांतून मांडलेल्या दिसतात त्यांस निश्चित प्रामाण्य असे कांहींच नसल्यामुळे सर्व शंकाचे निरसन होईल असे ठाम उत्तर कांहींच देता येत नाहीं. । वास्तविक पाहतां कोंकणस्थ कोठून आले, क-हाडे कोठून आले, देशस्थ कोठून आले, ब्राह्मण कोठून आले, क्षत्रिय कोठून आले, आर्य कोठून आले आणि अनार्य कोठून आले, असे प्रश्न न विचारतां मानवी प्राण्यांत आर्य आणि अनार्य, काळे, गोरे, पिवळे, आशियाटिक व युरोपिअन, इत्यादि भेद रूढ केव्हा झाले असा प्रश्न करून त्याचा शोध केला पाहिजे. पृथ्वीवर जेथे जेथे मनुष्यजात प्रथम निर्माण होणे शक्य झाले तेथे तेथे मनुष्य प्राणी जन्मला. तो कांहीं एकाच गांवांत जन्मला असला पाहिजे असे नाही, आणि जन्मतःच विशिष्ट नांव घेऊन जन्मला असेहि नाहीं. भिन्नभिन्न स्थळीं मानवी प्राणी जन्मास येऊन त्यांची तेथल्या तेथे वाढ किसी झाली तरी त्या गटाला विशिष्ट नांव मिळत नाही. एका ठिकाणी वाढत चाललेला जनसमूह जेव्हां कांहीं नैसगक कारणामुळे स्थलांतर करू लागतो आणि अशा स्थलांतरांत जेव्हां दोन गटांची गांठ पडते तेव्हां त्यांतल्या प्रत्येक गटाला कांही विशि