पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७) नांव दिले जाते. उपमा अलंकारांत ज्याप्रमाणे उपमा आणि उपमेय यांत भिन्नत्व असून साधर्म्य असावे लागते त्या प्रमाणेच मानवी वंशांतील पोटभेदांची नांवे रूढ होतांना त्या पोटभेदांत कांहीं भिन्नत्व आणि कांहीं साधर्म्य असावे लागते. हे सर्व सांगण्यांतला हेतु एवढाच की, देशस्थ, कोकणस्थ, क-हाडे असे भेद पडण्यापूर्वी असे विशिष्ट नामकरण न झालेला जनसमूह एकत्र आला असला पाहिजे आणि त्या समूहाला आपल्यांत कांहीं भिन्नत्व आणि कांहीं साम्य आढळल्यावर पोटभेद करण्याची आवश्यकता भासल्यावरून पोटभेदांची नांवे रूढ झाली असावीत. अर्थातच ज्या वेळी एका गटाला देशस्थ म्हणू लागले त्याच वेळी दुस-या गटाला कोंकणस्थ तिस-या गटाला क-हाडे म्हणू लागले असावेत, परस्पराशी कांहीं संबंध नसलेल्या अलग अलग ठिकाणीं देशस्थ, कोंकणस्थ, क-हाडे असे तीन गट अगदीं पृथक् पृथक् असे निर्माण झाले असे मानणे हे नैसर्गिक प्रवृत्तीला सोडून आहे. जो पर्यंत एकेक गट भिन्न ठिकाणी राहतो तोपर्यंत त्या गटाला विशिष्ट नांवाने संबोधण्याची गरजच पडत नाही. ज्या वेळीं चातुर्वण्र्यात एका वर्गाला क्षत्रिय म्हणू लागाल त्याच वेळी दुस-या वर्गाला ब्राह्मण असे नांव द्यावे लागेल. त्याचप्रमाणे ब्राह्मणांतील एका गटाला गौड म्हणण्याच्या वेळीच दुस-या गटाला द्रविड ही संज्ञा प्राप्त होते आणि याच न्यायाने दक्षिणी ब्राह्मणांत जेव्हां एका वर्गाला कोंकणस्थ संज्ञा मिळाली तेव्हांच दुस-याला देशस्थ ही संज्ञा मिळाली असली पाहिजे. या विवेचनाचा निष्कर्ष हाच की, चित्तपावन कुलांतील कोणत्याहि घराण्याची मूळ पीठिका १८ पिढ्याहून अधिक पूर्वीची सांपडत नसल्यास पांच सहाशे वर्षांपूर्वी या दोन गटांत वेगवेगळे नामकरण करण्याइतकी भिन्नता त्या वेळी त्यांच्यांत दृष्टोत्पत्तीस आली नसावी असे अनुमान निघते. संकोच आणि विस्तार कोकणस्थांतील आडनांवाचेहि मूळ शोःत गेल्यास त्याचाहि असाच पत्ता लागत नाही. परंतु आजची ३६० आडनांवे रूढ होण्यापूर्वी ती कमीत कमी ६० असावी अशी समजूत आहे व ती खरी आहे. कारण सृष्टीचा नियमच असा आहे की, एकांतून दोन, दोहोंतून चार असे भेद विकासाने निर्माण होतात पण याच्या उलट कधीहि चार गटांचे दोन, दोनीचा एक असा संकोच होत नाहीं. वनस्पती वर्गात जसा झाडांच्या जातींचा विकास होत चालला आहे, संकोच कधीच होत नाही, त्याचप्रमाणे कोकणस्थांतहि एका आडनावांतून वाढत वाढत साठ, साठांतून वाढत वाढत ३६० असा विकासाचा क्रम नैसर्गिक आहे. या विकासाला मात्र नैसर्गिक परिस्थिति प्रतिकूल असल्यास कोठे तरी खंड पडतो. अर्थातच ३६० आडनांवांची कालान्तराने ५०० आडनांवे होतील कां उलट ३६० तलीच कांहों आडनांवें लुप्त होतील, असा प्रश्न विचारल्यास त्याला निश्चित उत्तर देण्याला