पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५) या खेरीज स्त्रियांच्या महिला समाज, भगिनी समाज इत्यादि संस्था निर्माण होत आहेत. सेवासदनासारख्या अथवा तत्स्वरूपाच्या अनेक संस्था स्त्रिया चालवीत आहेत. स्त्रिया लोकसभांच्या सभासदहि होत आहेत. स्त्रियांच्या कर्तृत्वाची अशी अनेक स्थाने शोधून काढून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती कुलवृत्तान्तांत योग्य स्थळी देण्यात यावी. मराठे घराण्याच्या कुलवृत्तान्तांत किती स्त्रिया पदवीधर आहेत त्याची संख्या दिली आहे. पण किती स्त्रिया आपल्या कुटुंबाचा निर्वाह स्वतः चालवितात त्यांची नोंद देणे महत्त्वाचे आहे. केवळ पदवीधर झालेल्या स्त्रियांच्या संख्येला तसे महत्त्व नाहीं. स्थायिक कुटुंब किती ? कोणीहि गृहस्थ आपल्या घरची आर्थिक स्थिति परक्यास सांगू इच्छीत नाहीं. यामुळे कोणत्याहि कुटुंबाची सांपत्तिक स्थिति कशी आहे हे कळण्याला मार्ग नाहीं आणि तदभाधी कुलाची अभिवृद्धि होत आहे का अवनति होत चालली आहे याविषयी नक्की अंदाज करता येत नाही. संदिग्धतेचा हा पडदा थोडा तरी दूर सारण्यासाठी प्रत्येक कुटुंबाच्या माहितीत घर किंवा शेत अथवा दोन्ही अशा स्वरूपाची कांहीं स्थावर जिंदगी आहे की नाहीं एवढा प्रश्न विचारून माहिती मिळविण्यास व ती प्रसिद्ध करण्यास कांहीं हरकत नाहीं कारण कोणीहि गृहस्थ स्वतःच्या घरांत राहात आहे का भाड्याच्या घरांत राहात आहे आणि रानांत त्याचे शेत आहे का नाहीं हें शेजा-या पाजायासहि ठाऊक असतेच, तेव्हां ही माहिती देण्यांत कांही गोप्य स्फोट होणार आहे असे नाहीं.

  • यावर कोणी अशी शंका उत्थापित करतील कीं, नुसते गावांत घर आहे वा रानांत शेत आहे एवढे कळल्याने कांही सांपत्तिक स्थिति अनुमानितां येत नाहीं; स्वतःचे घर असलेला मनुष्यहि दरिद्री असू शकतो आणि दुस-याच्या घरांत राहणारा भाडेकरीहि श्रीमंत असू शकतो. ही शंका खरी असली तरी स्थावर जिनगीची माहिती नोंदण्याचा हेतु सांपत्तिक स्थिति अनुमानित यावी एवढाच नसून कोणतेहि कुटुंब आज जेथे वास्तव्य करीत आहे तेथेच ते राहण्याचा संभव किती हे ताडण्याकरिता ही माहिती घ्यावयाची आहे. आजमितीला कोठलाहि कुलवृत्तान्त घेतला तरी त्यांत विद्यमान व्यक्ति देशांत कोठेहि राहात असल्याचे, किंबहुना परदेशांतहि राहात असल्याचे आढळून येते. परंतु कुलाचा हा विस्तार तात्कालिक स्वरूपाचा असतो. नोकरीच्या पाठीस लागून आफ्रिकेत, अमेरिकेत वा इंग्लंडात गेलेला इसम नोकरी संपताच परत स्वदेशास स्वगृहीं येईल, पण जर त्याने आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी स्वत:च्या मालकीचे घरदार, शेतीवाडी केली असेल तर ते कुटुंब त्याच ठिकाणी स्थाईक होईल आणि अशा रीतीने कुलाची ती शाखा त्या स्थानी स्थिर होणार असे साहजिक अनुमान निघते. अशा रीतीने