पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ५ वें संशोधनार्थ वृत्तान्ताकरितां जमविलेल्या माहितीपैकी ज्या माहितीचा उपयोग अवश्य त्या तपशीलाचे अभावी पुस्तकांत करता आला नाही, अशी माहिती पहिल्या खंडाच्या नवव्या प्रकरणांत संशोधनार्थ दिली होती. यापैकीं अधिक तपशील उपलब्ध होऊन कांहीं माहिती निरनिराळया घराण्यांच्या माहितीत कशी समाविष्ट करतां आली ते पुढे दाखविले आहे. वृत्तान्त प्रसिद्धीनंतर वेरूळ व पैठण येथील क्षेत्रोपाध्यायांकडील लेख पाहावयास मिळाले. तसेच नासीक व त्र्यंबकेश्वर येथील अधिक लेख उपलब्ध झाले. माहितीची संगती लावण्यास अशा लेखांचा उपयोग झाला. नवीन मिळालेल्या लेखांपैकी ज्यांचा कोणत्याहि घराण्याच्या वंशावळीशी संबंध दाखविता आला नाही ते लेख क्र. ४३ पासून पुढे दिले आहेत. वाचकांनी त्याकडे लक्ष देऊन त्यांची संगती पुस्तकांत कोठे लावतां येईल ते कळवावे. खंड पहिला, पृष्ठ ३६४ ई या क्रमांकाशी संबंध असणारे पुढील ले निळाले आहेत; त्यावरून पूर्व दिलेल्या वंशावळीत वाढ होऊन झालेली नवीन वंशावळ खाली दिली आहे. पैठण धर्माधिकारी :- सदाशीवभाऊ बंधु दाजीवा, पुत्र नाना व रामचंद्र पेडने. -- पंढरपुर. नारायण सदाशिव आ. भगवंतभ. प. नारायणभट ३. रामभाऊ पुतणे गोविंद. वेरूळ-पैठणकर १०-४१. नारायणभट गणेशभट आ. नारायण भट बं. महादेवभट व गोपाळभट.-टेंभुर्णी साळशी. (या लेखांत नारायणभटाने आपल्या आज्याचे नांव नारायण सांगितले आहे; परंतु गुंडो महादेवने आपल्या पणज्याचे नांव केशव सांगितले आहे. यांत विसंगती दिसते. बाकी नांवे एकमेकांशी जमतात.) नाशीक-वा. दाते. ३४-५. साळूबाई भ्र. बाळाजी भगवंत भट नारायण च. सा. रघुनाथभट, दीर सदाशिव व विठ्ठल पुत्र जयराम पुतणे नारायण भट -पंढरपुर.