पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० पेंडसे—कुलवृत्तान्त

उपनाम भट होते त्यास आपले वडिलांनी आपले घरचे पुरोहित को मजकूरचे दिले होते त्यास येणे जाणे यास दूर पडो लागले साा को मजकुरीं ब्राह्मणाकडील पांचवा मान व आगर ठिकाण देवऊन गांवीं आणून ठेविले होते त्यास वडील गावीहून गेल्यावर मागे पुरोहित भट आमची आगरवाडी महाजनकी देखील झाडून वतनाची वैवाट करू लागले त्यावरून हालीं वो. राजश्री महादेवभट व गोपाळभट भटाचे वंशज्य वतनाची वैवाट करितात त्यांस भेटीस येण्याविस वगैरे बोलण्यास रााा बाबुराव सुरवे यांस पाठविले त्यांस मारनिल्हेनीं नौदिगर गोष्टी बोलोन सरकारांत फर्याद येऊन आमचे वतनाचा लोप करो पाहातात त्यास बहुत दिवस परागंदा सा आपण क्रियावल येविसीची चौकशी करून पांढरीच्या मुख आम्ही वतनदार महाजन को मजकुर हे खरे जाहाल्यास आमचे वतन आमचे हवाली करावे आम्ही सदरहू लिहिल्याप्रमाणे को मजकूरचे वतनदार याचे सहीसाक्षी निसी खरे करून देऊ. न देऊ तर सरकारचे गुनेगार. पोा बो भगवतराव गुजर खोत मौजे सेवसी तर्फ खेड तो। सुवर्णदुर्ग सुमा सन मयातैन अलफ लिहन दिल्हा जामीन कतबा ऐसीजे राजश्री तानाजी बिाा संकोजी राजे सिरके महाजन को आंजर्ले तर्फ केळशी यासी वेदमूर्ती राजश्री महादेवभट भट हे महाजनकी व आगर ठिकाणासी बाद सांगतात साा येविसीची पंचाईत पडली आहे यास राजे मजकूर........याणी कसवे लिहून दिल्हे आहेत त्यांची चौकसी को। मजकूरच्या वतनदारांचे सडोसाक्षीनिसी मनास आणून जबीचे रीतीने इनसाफ होऊन आज्ञा होईल त्याप्रमाणे याने मारनिल्हे वर्तणूक करतोल न करतील तर आपण खुद नि। वर्तऊन देऊ.