पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख ४७

  • २*****

तैसे राहिले. पुढे पुरंदरचे मुकामी बाबाजी बल्लाळ साठे हे पेंडसे यांचे आतेभाऊ. यांची चाल नानांजवळ बहुत ते हिमायतीने मनसुबीचा फडशा न होतो तो पेंडसे यास चालवणुकीबद्दल चिठी दिली आणि आम्हास पुरंदराहून मसाला करून चौबा भावांसहित घेऊन आले आणि चाप लाऊन मनस्वी उपद्रव करून सेते पेंडशाच्या हवाला करू ऐसे पत्र लिहून घेतले. आम्हांवर आदावतीही बहुतच घातल्या. बाबाजी बल्लाळ याजमुळे आपला इलाज न चाले म्हणून तसेच राहिले. हल्ली स्वामीचे राज्यांत धर्मन्याय गरीबग़रीबाचे वाजवी मनास आणून स्थापना होते या .... (हे पत्र अपूर्ण आहे). पे. द. जमाव रु. ४८० राजश्रीया विराजीत राजमान्य राजश्री आनंदराव तात्या स्वामींचे सेवेशी पो रामचंद्र खंडेराव साा नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असले पाहिजे विशेष मौजे मुरडी तर्फ केळशी येथील जप्ती करण्याविषयीं तुम्हांस पेशजी ली आहे. त्याप्रो कारकून पाठवून जप्ती करणे. राजश्री पांडो अणा तुम्हांशी बोलले त्याचे धमकीवर मोकळीक करितां हें काय आम्ही पुण्यास असतां तुम्हांस काय करावयाचे होते असो. जहाली गोष्ट ती तुम्हांपासून गेली. आतां पत्र पावतांच कुल बागायत जिरायत सुाा याद पाठविली आहे इतक्या इमल्यांची जप्ती करावी त्यांत कांहीं माल गेला असल्यास फडशा करून घ्यावा. केळशीकडील वर्तक वगैरे यांची शेते केळकर यांनी गहाण ठेवून अथवा कुभांडे करून शेते लोकांची घेतली आहेत त्यास तुम्हांजवळ जो जिन्नस जमा येईल त्याचा वाका लिहून घेऊन ध्यानांत आणून जप्ती करावयाजोगे जे आढळेल त्याची करीत जावी. दुमालाच करणे जाहलीयास पुरती चौकशी खातरजमेची पाहून करीत जावें. इकडील काळजी करीत जाऊ नये. येथून कारकून या कामाकरिता पाठवावयाचे नाही. तुम्ही कोणाचे भिडेस पडत जाऊ नये. येथील लिहिल्याप्रमाणे करीत जावे. येविषयी यजमान स्वारीची आज्ञा जाहालीच आहे रा।। छ १० जिल्हेज बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति. रा. धोंडोपंत नानास नमस्कार व गोविंदपंत यांस नमस्कार. तुम्ही येविशीचे माहीत असतां हे चांगले झाले नाहीं हे विनंति.

  • यांचा उल्लेख खंड पहिला पृष्ठ ६६ वर पांचव्या ओळींत आला आहे. हे पेंडसे यांचे आतेभाऊ असल्यामुळे देण्याघेण्याचा व्यवहार होता असे दिसते.

5 ऐतिहासिक क्रमांक ७ मधील धोंडो विश्वनाथ ते हेच काय ?