पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ पेंडसे-कुलवृत्तान्त । [ प्रकरण आहे, व सरकार अमलांत कै. रामशास्त्री बाबा याजकडे पंचायीत होऊन फडशा झाला तेव्हां दुसरे येजीतपत्र शके १६९७ मन्मथनाम संवत्सरी भट याणी लिहून दिले व पेंडसे याचकडे वतन चालविणे येविसी सरकारची पत्रे आहेत त्या प्रो पेंडसे यांजकडे मौजे मजकूरचे वतन महाजनकीचे चालत आहे. असे असतां हल्ली भट मशारनिल्हे यांनी सरसुभा गैरवाका मालूमाती एक पक्षी समजाऊन सुभ्यास पत्र नेलें यास्तव में पत्र तुम्हांस लिहिले आहे तरी सरसुभाचे पत्र व येथील पत्र भट यांनी नेलें आहे ते त्याजपासून परत घेऊन पुणेयासी पाठविणे. आणि मौजे मजकूरचे महाजनकीचे वतन आगर शेते वगैरे पूर्वापार चालत आल्याप्रमाणे पेंडसे महाजन यांजकडे चालविणे, भट आंजरलेकर यास पुणेयास रवाना करणे तार छ। १४ मोहरम सुाा समान मयातैन व अलफ बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति. १०५ | श. १७३०-३१ । स. १८०८-९ यादी महादाजी रघुनाथ भट महाजन कसबे आंजरलें तर्फ केळशी ताा सुवर्णदुर्ग सुा तीसा मयातेन व अलफ कसबे मजकूरचा महाजन आपली आम्ही पिढी दर पिढी अनुभव करीत आलों असे असतां मुर्डी पाखाडी ही कसबे मजकूरची वाडी ‘पुरातन असून तुलाजी आंगरे याचे अखेरीस गोविंद कृष्ण पेंडसे का मजकूर याणी नवीन कजीया उपस्थित केला की पाखाडी हा मौजा निराळा तेथील महाजन आपण ऐसा गैरवाका आंगरे यासी समजाविला व भट हे श्रीमंत पेशवे यांचे भाऊबद आपलेकडील वर्तमान वरचेवर सरकारांत समजावितात. ऐशा आदावती बहुत प्रकारे समजाविल्या त्याजवरून आंगरे याणीं येकायेकीं मनास न आणित पाखाडी हा मौजा निराळा म्हणोन पेंडसे यांसी चिठी दिल्ही आमचे पत्र जबरदस्तीने लिहोन घेतलें नंतर सा च्यार महिन्यांनीं अमल सरकारांत आला ते समयीं रामाजी महादेव सुभेदार यांजकडे हुजूराहून मनास आण्याविसी परवानगी जाहाली त्याजवरून सुभेदार याणीं पाखाडीची जप्ती करून पंचाईत मते व सडी साक्षीवरून व गांवच्या हदमहदूद चतु:सीमापूर्वक शोध करून व मागील दाखले व भोगवटे यावरून गांव एक असे ठरले. त्याजवरून पाखाडीची वहीवाट एकंदराकडे पूर्ववतप्रमाणे चालती केली. पेंडसे यांजवळून अजीतपत्र व पेशजी आंगरे याणी पत्र दिले आहे ते माघारे घ्यावें तों जामीनसुद्धा पळोन पुण्यास आला आणि सरकारांत समजाविलें कीं पंचाईत एक पक्षी जाहाली त्याजवरून सा चार महीने यानीं पाखाडीची जप्ती करून हुजूरहून सड्या घ्यावयासी कारकून गांवीं पाठवून साक्षी लिहून आणविल्या. त्याची चौकशी होऊन फडशा व्हावा तो कै. नारायणराव साहेबांचा काळ झाला. त्यामुळे