पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४५

  • ==== 5

-*

४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख महाजनकीसमंधे व गांवसमंधे सेत आगरवाडी पूर्ववत प्रो आमची आम्हांकडे चालो लागली. अलीकडे च्यारपाच वर्षात सुभाहून आंजरलेकर व मुरडीकर रयतावा कुले यान पांच सहा सेते लागवड करून धारा द्यावा याप्रो चिठ्या दिल्या आहेत व गयाली ठिकाण मौजे मजकुरी होते ते आम्हीं महामुरा केले असतां सुभाहून अमानत केले आहे त्यास सदरहू निवाडपत्राअन्वये आगर व सेत आमची आम्हांकडे चालवावी. सालमजकुरी ज्यानीं सेते लागवड केली आहेत त्यापासून अधेल देविली पाहिजे म्हणोन. त्याजवरून हे पत्र तुम्हांस सादर केले असे. तरी महाजनकी समंधी व गांव समंधे सेते सुदामत चालत आल्या प्रो। याजकडे चालवणे. दरम्यान सुभाहून याजकडे सेते असतां आंजरलेकर व मुरडीकर कुलास धान्याने सेते दिल्ही असतील त्याची अवैल पेंडसे यास देवऊन सरकार दस्ताची उगवणी याजपासून करून घेत जाणे. गयाली ठिकाण मौजे मजकूरी होते त्याचा महामुरा पेंडसे यांनी केला असोन हली तुम्ही ते ठिकाण अमानत केले त्यास यानीं महामुरा केला असल्यास याजकडे ठिकाण चालवणे. सदरहू ठिकाणाचा वारीसदार कोणी असल्यास त्यास सरसुभा पावन देणे समजोन आज्ञा कणं ते केली जाईल. जाणीजे छ १७ सफर पा उजर ॐ १७ सफर पा उजुर ( श. १७२९ फाल्गुन शु. १५ १०४ ४ । इ. १८०८ मार्च १२ शनिवार राजश्रीया विराजीत राजमान्य राजश्री दीनकरपंत केळकर स्वामीचे सेवेशीं, पोा सदाशिव माणकेश्वर सा. नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहीत जावे विशेष, राज़श्री नारो महादेव पेडसे व अंताजी गोविंद पेंडसे महाजन मौजे मुर्डी ताा केलसी ताा, सुवर्णदुर्ग यांनी समजाविले कीं छ ११ जिल्हेजचे पत्र भट आंजरलेकर याणी आपल्याकडील नेले त्यांतील मजकूर राजश्री महादाजी रघुनाथ भट को आंजरले याचा व अंताजी गोविंद पेंडसे याचा प्रो। मजकरचे मुड पाखाडी विसी कजीया लागला आहे त्यास भट याणी आपले भोगवटे याचे कागद सरसुभास दाखवून मुर्डी पाखाडी आपलेकडे चालवणे याविसी पत्र घेऊन पेंडसे यास सरसुभाचे बलावणे केले आहे. त्याप्रा, जाहाले पाहिजे म्हणोन महादाजी रघुनाथ याणी समजाविलें त्याजवरून हे पत्र लिहिले असे. तरी पेंडसे या स सरसुभाकडे रवाना करून भट महाजन याजकडे मुड पाखाडीची वहीवाट कसब्याकडे पूर्ववत प्रो। जसी चालत आली असेल त्या प्रो। सरसुभाचे पत्राअन्वये सुदामत चालविणे. पेंडसे याचे कांहीं बोलणे असल्यास सरसुभाकडे अगर हिकडे रवाना करावे वाजवी मनास आणोन करण्यात येईल. म्हणोन त्याजवरून पेंडसे महाजन पुणेयास येऊन आपले कागदपत्र वतनाचे समजाविले त्यांतील अर्थ मौजे मजकूर हा गांव निराळा तेथील महाजनकीचे वतनाचा खटला पडला होता त्याचा निवाडा आंगरे यांचे कारकीर्दीत होऊन भट यांचे येजीतपत्र शके १६७५ श्रीमुख संवत्सरीचे