पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण पे. द. रो. रु. १०२ श. १६९७ आषाढ व. ५ स. १७७५ जुलै १७ सीत सवैन मया व अलफ जमादिलावल छ १८ आषाढ व. ५ इंदुवासरे दशक १६९७ मन्मथनामसंवत्सरे मुाा माची किल्ले पुरंदर रवासुदगी बाा देणे ताा गाडदी दी। अबदुल कादर यास मसाल्याबाबद बाा चिठी चिटणीस रु. १०० शंभर. शंभर रुपये मसाल्याबाबत हाय रु. चाल गोविद कृष्ण पेंडसे महाजन मौजे मुर्डी ताा केळशी ता. सुवर्णदुर्ग याचा मौजे मजकूराविषयीं कजीया लागोन मननुवी हुजूर पडली होती त्याचा निवाडा होऊन पेंडसे वादास खरे जाहले सबब याजपासून सरकारांत हरकी घेऊन मौजे मजकूर सरकारांत जप्त होता तो मोकळा करून पूर्ववतप्रमाणे महाजनकी शेत भात सुद्धा पेंडसे याजकडे चालवावा याविषयी सनद सादर झाली असतां व त्याप्रमाणे सुभाहून चिठ्या दिल्या असतां धटाई करून मौजे मजकूरची शेते पेंडसे यास लाऊ देत नाही. मारामार करितात. सुभाचे ताकीदीस मानीत नाहींत येविशसींचे मनास आणावयाकरितां हुजूर आणवून देवविले. रु ५० ब। गणेश रघुनाथ व बाबाजी रघुनाथ व नारो रघुनाथ भट महाजन । कसबे आंजर्ले तर्फ मजकूर यांजकडून देवविले. रु २५ वा गणेश नारायण भट महाजन ताा आंजर्ले तर्फ मजकूर यांजकडून. रु २५ बाा कृष्णशेट सोनार तळेकर व जिऊशेट विन महादसेट सोनार कसबे आंजर्ले याजकडून. १०० १०३ , श. १७१६ भाद्रपद व. ३ । १ । स. १७९४ सप्टेंबर १२ अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजश्री मोरो बापूजी गोसावी सेवक यासी माधवराव नारायण प्रधान नमस्कार सुहूर सन खमस तीसेन मया व अलफ कृष्णाजी गोविंद पेंडसे महाजन मौजे मुर्डी ताा केळसी ताा सुवर्णदुर्ग यानीं सरसुभा पुण्याचे मुकाम विदीत केलें कीं मौजे मजकूरचे महाजनकी विसीं महादाजी रघुनाथ व गणेश नारायण भट महाजन का आंजरलें ताा मजकूर याचा व आमचा कजीया लागून मनसुबी सरकारांत गेली. तुळाजी आंगरे याचे कारकीर्दीत विजेदूर्गचे मुकाम निवाडा होऊन आम्हांस निवाडापत्र करून दिल्हे व आंजरलेकर महाजन याजपासून येजीतखत देविले. पुढे सरकार अमल स्वराज्य जाहाल्यावर आंजरलेकर महाजन मनसुबीस उभे राहिले. तेव्हां सरकारांत निवाडा होऊन आम्हांस निवाडपत्र करून दिल्हे व वादी याचे पत्र ताा मजकूरचे देशमुख याचे साक्षीनीसी देविलें त्याप्रो आमचे