पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख ४३ म्हणोन. ऐसियास सरकारची सनद सादर जाहली असता महाजनकी याची याजकडे चालवावयास दिक्कत करितां हे कार्याचे नसे. हल्ली में पत्र सादर केले असे तरी पेशजीचे सनदेप्रमाणे मौजे मजकूरचे महाजनकीचे वतन दोबस्त पेंडसे मजकूर याजकडे चालविणे येविसीचा फिरोन बोभाटा आलिया कार्यास येणार नाहीं म्हणोन सनद छ १ राााखर सन खमस सवैनची सादर येणेप्रमाणे दोन सनदा, तुम्ही आणिल्यावरून सनदांच्या अन्वये मौजे मजकूरचे महाजनकीचे वतन सरकारांत जप्त होते ते मोकळे करून तुमचे तुम्हांकडे चालते केले असे. तरी मौजे मजकरचे महाजनकीचे वतन चालवून महाजनकी संबंधे मुशाहिरा सुदामत असेल तो व वेतन संबंधे मानपान वेठबेगार व आगर शेते XXपेशजीच्या चालीप्रमाणे अनुभवून गावकीर्द आबादी करून सालमजकूरापासून सरकार दस्ताची उगावणी करून सुखरूप राहाणे. छ १६ माहे रबिलाखर मोर्तब सुद. श. १६९६ माघ वद्य. ५ चे चिटणीशीपत्र मोरो बापुजीचे नांवे आहे. त्यांत पेंडसे यांजवळून रु ४०१ नजर घेतले असून ते “ छ १८ जिल्हेज रोजी पोता जमा असे मुक्काम पुणे हस्ते खुद्द असे लिहिले आहे. श. १६९७ ज्येष्ठ व. १४ 9 1 स. १७७५ जून २६ पूरा राजश्री सदाशिव विश्वनाथ हवालदार तार केलसी गोसावी यांस सुाा सीत सवैन मया व अलफ गोविंद कृष्ण व महादाजी बल्लाळ पेंडसे महाजन मौजे मुरडी ताा मजकूर यांनी विदित केलें कीं मौजे माारों का आजरलेकर भट महाजन वगैरे सेत करितात त्याविसीं महालास आगोदर सनद सादर जाहालीच आहे. त्याअन्वये सेताची नागरटी चालऊन आम्ही लागवड करणार भट महाजन धटाईस येऊन मारामारीस प्रवर्तणार येविशीची आज्ञा काय म्हणोन त्यावरून हे पत्र तुम्हांस सादर केले असे. तरी पेशजीचे सनदेप्रमाणे पेंडसे महाजन सेताची लागवड करीतील. आंजरलेकर महाजन वगैरे धटाई करून मारामार करू लागल्यास त्याचे पारपत्य केले जाईल येविसी तुम्ही त्यास ताकीद करून सदरहू अन्वये मारामार होऊ लागल्यास तुम्हीं पारपत्य करणे. गैरवाजवी कजीया करावयास प्रयोजन कोणास नाहीं. निक्षुन ताकीद करून सुरलीत सनद पेशजी सादर आहे त्याप्राा वर्तवणे जाणीजे छ २१ माहे रााखर मोा।