पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ : पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण - --- होते त्यावर आंजरलेंकर भट महाजन व रयत खोती करू लागले त्यांणी मौजा मोडून आंजरल्याखाली ओढीला होता त्याची मनसुबी तुळाजी आंगरे यांनी करून पूर्ववत प्रो मौजा निराळा करून आपले स्वाधीन केला म्हणोन. व भट म्हणतात की मुर्डी मौजा निराळा नाहीं आंजरल्याचा वाडा तुळाजी आंगरे यांनी जबरदस्तीनें मौजा निराळा करून पेंडसे यांचे स्वाधीन केला म्हणोन. याप्रमाणे हरदुजणाचा कजीया लागोन मनसुबी पेशजी हुजूर पडली ते हरदूजणाजवळील कागद पाहून दोघांचे रजावतीचे साक्षीदाराच्या साक्षी हुजूर लिहून आणविल्या त्यावरून पाहतां मुरडी मौजा त्यास भट महाजन, आंजर्लेकर यांनी विनंति केली की मौजा निराळा नव्हे. या विसीचे साधकाचा कागद आम्ही आणितो तो पाहून करणे ते करावें. ऐसा करार करून गेले होते त्यास सालमजकुरी भट हुजूर आले त्याणी कराराप्रमाणे कागद दाखवावा तो न दाखविता पेशजी कागद आणून दाखविले त्याची चौकशी होणे. ते जाहाली असतां फिरोन त्याच कागदाच्या नकला आणून दाखविल्या नवा कागद कांही दाखविला नाही. आणि घरास गेले. त्यास सडी साक्षीचा व तुळाजी आंगरे याणीं निवाड पत्र पेंडसे यास करून दिले त्याचा अर्थ पाहून पेंडशापासून नजर रुपये ४०१ सरकारांत घेऊन मौजे मुर्डी येथील महाजनकीचे वतन सरकारांत जप्त आहे ते मोकळे करून हे पत्र तुम्हांस सादर केले असे तरी पेशजी तुळाजी आंगरे याणी मुर्डी गांव निराळा करून तेथील महाजनकीचे वतन मानपानसुद्धा पेंडशाकडे चालविले होते त्याप्रमाणे महाजनकीचा मुशाहिरा सुदामत असेल तो वगैरे मान हल्ली पेंडसे महाजन याजकडे चालविणे सदरहू नजरेचे रुपये याजपासून घेतले आहेत. त्यास पेस्तर फडशा करून यासी मजूरा दिल्हे जातील म्हणोन छ १७ जिल्हेज सन खमस सबैनची सनद सादर झाली त्याप्रमाणें मौजे मुर्डी येथील महाजनकीचे वतन तुम्हांकडे सुभाहून चालतें करावें परंतु भट महाजन आंजरलेकर यांचा व तुमचा कजीया सुभास येऊन भट महाजन हुजूर निघोन गेले तेव्हा तुम्हांसही हुजूर जावयाची आज्ञा जाहल्यावर तुम्ही हुजूर जाऊन हरदुवादी हुजूर रुजु झाल्यावर दुसरी सनद हुजूरहून आणिली कीं गोविद कृष्ण व महादाजी बल्लाळ पेंडसे महाजन मौजे मुर्डी तर्फ केळशी ताा सुवर्णदुर्ग यानीं हुजूर पुरंदरच्या मुक्कामी विदित केलें कीं मौजे मजकूर हा गांव निराळा आंजरलें याचा वाडा नव्हे. तेथील महाजनकी आमची असतां महादाजी रघुनाथ व गणेश नारायण भट महाजन कसबे आंजरले ता. मजकूर हे म्हणत होते की मुर्डी हा कसबे मजकूरचा वाडा. मौजा निराळा नव्हे. येविसी त्याचा आमचा कजीया लागोन मनसुबी हुजूर पडली होती ते विल्हेस लाऊन मौजे मजकूरचे महाजनकीचे वतन सरकारांत जप्त होते ते मोकळे करून आमचे आम्हाकडे चालवावयाविसी सुभा सनद सादर जाहाली असतां त्याप्रमाणे वतन आपणाकडे सुभाहून चालते करीत नाही येविसी आज्ञा जाहाली पाहिजे