पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० पेडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण

पाहिजे त्यावरून हे पत्र सादर केले असे. तरी नारो त्रिंबक यानी जंजीरे मजकूरी रूवरू इनसाफ करून सुदामत प्रमाणे महाजनकी व ठिकाणे भटाकडे चालते त्याप्रमाणे चालवणे. खांबेटे व. पेंडसे कजीया करतील तर त्यास नारो त्रिंबक याजकडे पाठविणे. आपले वर्तमान सांगतील. नारो त्रिंबक यानीं समजवून विनंती हुजूर करतील. कांहीं दिकत असल्यास मनास आणिले जाईल. तूर्त नारो त्रिंबक यानीं केल्याप्रमाणे चालवणे. सावणे पाखाडी कसबा मजकूर येथील कुरण नूतन खांबेटे राखतात त्यास राखो न देणे म्हणोन रामाजी महादेव यासी पत्र चिटणीसी. } ९७ श. १६८७ पौष व. ३० पे. द. रो. रु. ६५१ १६८७ पौष व. ३० । स. १७६६ जानेवारी ११ सु. सीत सीतैन मया व अलफ छ २९ रजब रामाजी महादेव तालुका सुवर्णदुर्ग याचे नांवे पत्र की गोविंद कृष्ण पेंडसे यांचा व महादाजी रघुनाथ भट यांचा मौजे मुर्डी तर्फ केळशी येथील महाजनकीचा कजीया लागून मनसुबी हुजूर पडली आहे त्यास गोविंद कृष्ण हुजूर मनसूबी सांगत असता महादाजी रघुनाथ भट सरकारची आज्ञा न घेतां पळोन गेला, याजकरतां हे पत्र तुम्हांस सादर केले असे. तरी भट मजकूर याजपासून १० दहा रुपये मसाला घेऊन भटास व मनसुबीचे संचा साक्षीचे कागद पत्र तुम्हापाशीं असतील ते लखोटा करून हजर पुण्यास जलद रवाना करणे म्हणोन चिटणीस छ २० रजव. पे. द. रो. रु. ६५१ , श. १६९० पौष व. ३० । स. १७६९ फेब्रुवारी ६ । सु. तीसा सीतैन मया व अलफ छ २८ रमजान. गोविंद कृष्ण पेंडसे व महादाजी रघुनाथ भट महाजन कसबे आंजर्ले यांचा मुर्डीविशी कजीया आहे. त्यास पेंडसे म्हणतात की आंजर्ले गांव निराळा व मुर्डी गांव निराळा. मुर्डीची महाजनकी आपली व भट म्हणतो कीं मुर्डी गांव निराळा नाहीं. आंजल्र्याचा वाडा. तेथील महाजनकी आपली आहे. म्हणोन भांडण भांडतात. त्याचा निवाडा पेशजी तुळाजी आंग्रे यांनी केला. तेव्हां पेंडसे खरे झाले. त्याजवरी सरकारचे अमलांत तुम्ही मुर्डी व आंजर्ले अमानत करून सड्या घेतल्या त्याउपरी नारो त्रिंबक यानीं सड्या घेऊन दोन गांवचा एक गांव करून भटाकडे महाजनकी चालती केली. त्याअन्वये हजरचे ताकीदपत्र भटाने घेतले होते. परंतु मनसुबीचा निर्वाह जाहला नाहीं. हाली ते अन्वये कागदपत्र हुजूर मनास आणितां गांव दोन किंवा एक हा ठराव होत नाही. मागती सड्या घेऊन शोध करावा लागतो. याजकरितां मुर्डी अमानत