पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे | ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख ३९

  • * * *
  • * *
  • *
  • =

कृष्णाजी पेंडसा महाजन याची साक्षी कृष्णंभट वैद्य वाा वेळास. येणेप्रमाणे दाखले नऊ ९ पूर्वीचे चालत होत. मनास आणावे. येणेप्रमाणे दाखले असत. आंजर्लेकर सर्व एकत्र होऊन गांव एकच म्हणतात. सदरहू दाखले पेंडसे याणी लिहून दिले याची यादी बी. तपशील. पे. द. जमाव रु. ५८५ श. १६८३ वैशाख व. ११ शनि. स. १७६१ मे ३० गणेश नारायण महाजन यांनी केसोराम खांबेटे यांनी आम्हांस मारेकरी वगैरे घातले ऐसे मनस्वी भाषण केलें सबब मसाला* गुणा भवानजीसिंग परदेशी रु. ५ पे. द. रो. रु. ६५१ | श. १६८५ पौष शु. १४ स. १७६४ जानेवारी १७ सु. आरबा सीतैन मया व अलफ छ १३ रजव. बापूजी रघूनाथ भट महाजन कसवें आंजर्ले तर्फ केळशी यानीं हुजूर विदीत केलें कीं मुर्डी पाखाडी कसबे मजकूर येथील महाजनकी आपली असतां गोविद कृष्ण पेंडसा चौगुला कसबा मजकूर हा आपली म्हणून कजीया करीत होता व कसवा मजकूर घर आहे ते ठिकाण केसो राम खांबेटे आपले म्हणून कजीया करीत होते त्यास सालगुदस्त, तालुका मजकूरी नारो त्रिवक गेले होते ते समय जंजीरे सुवर्णदुर्गचे मुकामीं साक्ष माझे व भोगवटा मनास आणिला त्यावरून पेंडसा महाजनकीस व खांबेटा ठिकाणास लागू होत नाहीं दोन्ही वतने आपली असे पंचाइताचे मते झाले. त्यावरून महाजनकी अमानत होती ते मोकळी करून आम्हांकडे चालती केली व ठिकाण पहिल्यापासून चालते त्याप्रमाणे चालते केले. त्याजवर पेंडसा हुजूर येऊन महाजनकी अमानत म्हणून सनद घेऊन गेला त्याजवरून महाजनकी अमानत केली आहे. ती नासे त्रिंबक यानीं चालती केली त्याप्रमाणे चालविणे म्हणोन ताकीद झाली

  • मसाला ही एक ऐतिहासिक फारसी संज्ञा आहे व त्याचा एक अर्थ दंड हा आहे. ज्या व्यक्तीवर कांहीं गुन्ह्याचा आरोप असेल त्या व्यक्तीला सरकारांत बोलावून आणण्याचे काम करणा-याला हा मसाला परस्पर त्या व्यक्तीकडून मिळावयाचा असे.